गोवा कॉलनीतील फायरिंग दारूच्या गुत्त्यावरील वादातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 09:56 PM2021-07-23T21:56:44+5:302021-07-23T21:57:16+5:30

Firing in Goa Colony गुरुवारी रात्री गोवा कॉलनीत झालेली फायरिंगची घटना दारूच्या गुत्त्तयावर झालेल्या वादामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सदर पोलिसांनी रात्रभर धावपळ करून सहाही आरोपींच्या मुसक्या बांधल्या.

Firing in Goa Colony from a dispute over alcohol | गोवा कॉलनीतील फायरिंग दारूच्या गुत्त्यावरील वादातून

गोवा कॉलनीतील फायरिंग दारूच्या गुत्त्यावरील वादातून

googlenewsNext
ठळक मुद्देरात्रभर शोधाशोध, ६ जण गजाआड - आरोपींच्या अटकेतून खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - गुरुवारी रात्री गोवा कॉलनीत झालेली फायरिंगची घटना दारूच्या गुत्त्तयावर झालेल्या वादामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सदर पोलिसांनी रात्रभर धावपळ करून सहाही आरोपींच्या मुसक्या बांधल्या.

अशफाक अनवर खान (वय २०), मुस्तकिन सलीम खान (वय २५), आबिद अहमद खान (वय १९), आस्टिन विल्सन जोसेफ (वय १९), महताब असिमुद्दीन अंसारी (वय १९) आणि अरमान अहमद खान (वय २२) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ते सर्व बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ असलेल्या मरिअमनगर झोपडपट्टीत राहतात.

सदर मधील गोवा कॉलनीत सलीम आणि शकिल पठाण हे गावठी दारूची अवैध विक्री करतात. आरोपी अशपाक याला दारू, गांजाचे व्यसन आहे. तो गुरुवारी रात्री ७ वाजता आपल्या एका मित्रासह सलिमच्या दारू गुत्त्यावर आला. तेथे दारूचे माप कमी देण्यावरून त्याचा सलीम आणि शकिलसोबत वाद झाला. यावेळी सलिम आणि शकिलने आरडाओरड करणाऱ्या अशपाक आणि त्याच्या मित्राला बाहेर काढण्याचे सूरज रामदास नायडू (वय २१) याला सांगितले. सूरजने अशपाक आणि त्याच्या मित्राला हुसकावून लावले असता आरोपींनी त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे सूरजने त्यांना झापड लगावल्या. या अपमाणामुळे आरोपींनी त्याला तेथेच थांब, हमला घेऊन येतो, असे म्हटले आणि पळून गेले. रात्री ९ च्या सुमारास दोन दुचाकींवर आरोपी अशपाक, मुस्तकिन, आबिद, आस्टिन, महताब आणि अरमान असे सहा जण आले. अशपाककडे पिस्तुल, तर अन्य आरोपींकडे तलवार, चाकू, भाला अशी घातक शस्त्रे होती. त्यांनी सलिम आणि सूरजच्या नावाने शिमगा करून ते नजरेस पडताच त्यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. नशिब बलवत्तर म्हणून कुणालाही गोळी लागली नाही. मात्र, या घटनेमुळे गोवा कॉलनीत प्रचंड दहशत निर्माण झाली. माहिती कळताच पोलीस उपायुक्त विनिता साहू , सहायक आयुक्त सुधीर नंदनवार, ठाणेदार संतोष बकाल आणि मोठा ताफा घटनास्थळी पोहचला. आरोपींची माहिती घेऊन पहाटेपर्यंत आरोपींची शोधमोहिम राबविण्यात आली. त्यानंतर सहाही आरोपी हाती लागले.

मुंबईहून आणले पिस्तुल

आरोपी अशपाक हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध चोरीच्या सोन्याची विल्हेवाट लावण्याचा चार महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्याला दारू, गांजाचे व्यसन असून तो अंमली पदार्थाच्या तस्करीत गुंतल्याचा संशय आहे. त्याने मुंबईतून ही पिस्तुल आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे. कुणाकडून आणली, ते मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

Web Title: Firing in Goa Colony from a dispute over alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.