तामसवाडीत हवेत गाेळीबार; दाेघांना अटक, इम्पाेर्टेड माउझरसह पाच काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 01:37 PM2022-04-12T13:37:14+5:302022-04-12T13:41:19+5:30
तिघेही कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. ही कारवाई पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा नजीकच्या तामसवाडी शिवारात साेमवारी दुपारी घडली.
खापरखेडा (नागपूर) : माउझरची तपासणी करण्यासाठी हवेत गाेळीबार करीत असल्याचा प्रकार लक्षात येताच आराेपीच्या शाेधात फिरत असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने दाेघांना अटक केली. त्या दाेघांकडून इम्पाेर्टेड माउझर व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. तिघेही कुख्यात गुन्हेगार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. ही कारवाई पारशिवनी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा नजीकच्या तामसवाडी शिवारात साेमवारी (दि. ११) दुपारी घडली.
श्रीकांत प्रल्हाद नारनवरे (३०, रा. तामसवाडी, ता. पारशिवनी) व प्रतीक लीलाधर चवरे (२३, रा. सिल्लेवाडा, ता. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या तर सागर सहारे (२३, रा. दहेगाव जाेशी, ता. पारशिवनी) असे फरार आराेपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आराेपीच्या शाेधात तामसवाडी परिसरात फिरत हाेते. त्याच वेळी तिन्ही आराेपी तामसवाडी शिवारातील नदीच्या काठावर फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली हाेती. त्यामुळे या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना गाेळीबार केल्याचा आवाज ऐकायला आला. त्यामुळे या पथकाने शिताफीने श्रीकांत व प्रतीकला ताब्यात घेत त्यांच्याकडील माउझर जप्त केले.
या पथकाने श्रीकांताच्या घरांची झडती घेतली. त्याच्या घरातून पाेलिसांनी पाच जिवंत काडतुसे जप्त केली. या दाेघांनाही लगेच अटक करण्यात आली असून, त्यांचा एक साथीदार फरार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली.
याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा सहकलम ३, ५(१), २५, २७ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पाेलीस निरीक्षक अनिल राऊत, वीरेंद्र नरड, नाना राऊत, साहेबराव बहाळे, विनोद काळे यांच्या पथकाने केली.
खुनाचा कट उघड
माउझर व सात जिवंत काडतुसे सागर सहारे याने आणून दिल्याची माहिती दाेघांनी पाेलिसांना दिली. या तिन्ही आराेपींचे कृष्णा यादव, रा. चनकापूर, ता. सावनेर याच्याशी वैमनस्य आहे. त्याचा खून करण्यासाठी सागरने माउझर व काडतुसांची खरेदी केली हाेती. दाेघांनी माउझर चेक करण्याचा प्रयत्न केला आणि पाेलिसांच्या जाळ्यात अडकले. यात त्यांनी दाेन काडतुसांचा वापर केला. तिघेही मारहाणीच्या प्रकरणात लिप्त असल्याची माहिती पाेलीस सूत्रांनी दिली.