रेतीच्या वादातून नागपूरनजीकच्या पिपरीत फायरिंग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 11:26 PM2018-06-26T23:26:06+5:302018-06-26T23:28:25+5:30
देशी कट्ट्यातून झाडण्यात आलेल्या छºर्यांमुळे एक जण जखमी झाला तर, दुसऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो अत्यवस्थ आहे. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे मंगळवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. हा प्रकार रेतीच्या वादातून घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असूनही पोलीसही संभ्रमात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : देशी कट्ट्यातून झाडण्यात आलेल्या छºर्यांमुळे एक जण जखमी झाला तर, दुसऱ्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो अत्यवस्थ आहे. ही घटना कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी येथे मंगळवारी रात्री ८.४५ वाजताच्या सुमारास घडली. हा प्रकार रेतीच्या वादातून घडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असूनही पोलीसही संभ्रमात आहेत.
अमर ऊर्फ गब्बर भारत सोनटक्के (३०, रा. पिपरी, ता. कन्हान) असे गंभीर जखमीचे तर रोहन श्याम खरे (२९, रा. पाटीलनगर, कन्हान, ता. पारशिवनी) असे छºर्यामुळे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिपरी परिसरात मृतदेह पडला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र, तिथे अमर जखमी अवस्थेत पडला असल्याचे निदर्शनास आले. त्याच्यावर चाकूने वार केले होते. तो कन्हान नगर परिषदेत टँकरचालक म्हणून काम करतो.
दुसरीकडे, रोहन हादेखील स्वत:हून कन्हान येथील शासकीय रुग्णलयात भरती झाला. त्याने पोलिसांना सांगितले की तो कॅटरिंगचा व्यवसाय करीत असल्याने कामगारांना पैसे देण्यासाठी रात्री पिपरी येथे गेला होता. तेथील चर्चजवळ पैसे देत असताना कुणीतरी त्याच्या दिशेने फायरिंग केले. त्यात त्याच्या पोटात अंदाजे २० छर्रे शिरले. दरम्यान, दोघांनाही नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.
अमर व रोहन रेती व्यवसायात गुंतले असून, वेगवेगळ्या गटात सहभागी आहेत. या दोन्ही गटांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याच वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि त्यात अमर जखमी झाला असावा तसेच त्यानंतर रोहनवर छर्रे फायर करण्यात आले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.