वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:24 AM2017-09-28T01:24:37+5:302017-09-28T01:24:50+5:30
काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी कर्मचाºयाच्या कमरेत शिरल्याने ते जखमी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी वेकोलि कर्मचाºयावर गोळीबार केला. त्यातील एक गोळी कर्मचाºयाच्या कमरेत शिरल्याने ते जखमी झाले. हा थरार कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्री येथे बुधवारी (दि. २७) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला. जखमीची प्रकृती चिंताजनक असून मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वर्षभरातील ही तिसरी मोठी घटना आहे, हे विशेष! या प्रकरणातील आरोपी अद्याप पोलिसांना गवसले नाही.
जगदीश शालिकराम श्रावणकर (५९, रा. मच्छीपूल, कामठी) असे जखमी वेकोलि कर्मचाºयांचे नाव आहे. ते वेकोलि कामठी खुल्या खाणीत आॅपरेटर पदावर कार्यरत आहेत. जगदीश हे बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास एमएच-४०/एएच-८४२४ क्रमांकाच्या बुलेट मोटरसायकलने कामठी येथून निघून वेकोलि खाणीत ड्युटीवर जात होते. दरम्यान कन्हानसमोर कांद्री बसथांब्याजवळ येताच काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी जगदीश यांच्यावर पिस्तूलच्या दोन गोळ्या झाडल्या.
त्यातील एक गोळी हवेत गेली तर दुसरी गोळी त्यांच्या कमरेत शिरली. त्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाले. सकाळच्या सुमारास झालेल्या या फायरिंगने नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. याबाबत कन्हान पोलिसांना माहिती मिळताच ठाणेदार रवींद्र गायकवाड यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमी जगदीश यांना लगेच वेकोलिच्या जे. एन. हॉस्पिटलमध्ये भरती केले. तेथून कामठीच्या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने अखेर मेयोमध्ये हलविण्यात आले.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरासह महामार्गावर नाकेबंदी करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत कन्हान पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार गायकवाड करीत आहे.
वर्षभरातील तिसरी मोठी घटना
कन्हान परिसरातील वर्षभरातील ही तिसरी मोठी घटना आहे. गत १४ मे रोजी कन्हानच्या अमित ज्वेलर्समध्ये २१ लाख ४२ हजार रुपयांचा दरोडा टाकण्यात आला होता. त्यानंतर गोंडेगाव भागातील युको बँकेतही दरोडा टाकून सात लाख रुपये लंपास केले. त्यानंतर बुधवारी फायरिंग करण्यात आली. त्यात वेकोलि कर्मचारी जखमी झाला. यावरून या भागात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास येते. युको बँकेत दरोडा टाकणाºयांना पकडण्यात अद्याप कन्हान पोलिसांना यश आलेले नसताना ही घटना घडली. या घटनेतील आरोपीही पसार झालेले आहेत. गुन्हेगारी आणि गुन्ह्यांच्या संदर्भात कन्हान हे दिवसेंदिवस संवेदशनशील म्हणून पुढे येत आहे. दुसरीकडे आजच्या या घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस ठाण्यात संपर्क केला असता दूरध्वनी बंद असल्याने बराच वेळ संपर्क झाला नाही. तोपर्यंत आरोपी पसार झाले.