वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण रविवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:04 PM2020-06-20T23:04:39+5:302020-06-20T23:06:17+5:30
या वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण रविवारी २१ जूनला होणार आहे. कंकणासारख्या आकाराचे ते दिसणार असल्याने आणि रविवारी होणार असल्याने याला ‘चुडामणी’ असेही नाव देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : या वर्षातील पहिले कंकणाकृती सूर्यग्रहण रविवारी २१ जूनला होणार आहे. कंकणासारख्या आकाराचे ते दिसणार असल्याने आणि रविवारी होणार असल्याने याला ‘चुडामणी’ असेही नाव देण्यात आले आहे.
ज्योतिष आणि विज्ञानाच्या गणनेनुसार, यावेळी होणाऱ्या ग्रहणामध्ये सूर्याचे ९८ टक्के बिंब चंद्राकडून झाकले जाईल. ज्योतिष शास्त्रानुसार, हे ग्रहण काही प्रमाणात शुभ फळ देणारे आहे. मृगशीर्ष, आर्द्रा नक्षत्र आणि मिथुन राशीच्या लोकांना हे ग्रहण लागेल. ग्रहणादरम्यान, गुरु, शनी, मंगळ, शुक्र, राहू आणि केतू वक्री अवस्थेत असतील. हे ग्रहण अंशत: किंवा पूर्णत:ही नसेल. सूर्यग्रहणानंतर कोविड-१९ च्या संक्रमणात घट होईल. साधारणत: नोव्हेंबर २०२० पर्यंत कोविड-१९ चा प्रकोप बराच कमी झालेला असेल.
यासंदर्भात पं. उमेश तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजून १७ मिनिटांपासून ग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. मध्य दुपारी १२ वाजून ०१ मिनिटांनी असेल, तर मोक्षकाळ दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी होईल. ते म्हणाले, ग्रहणाच्या १२ तासांपूर्वी म्हणजे २० जूनच्या रात्रीपासूनच सूतककाळ सुरू झालेला आहे. या काळात भोजन, शयन, प्रभुप्रतिमा स्पर्श आदी वर्जित आहे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती तसेच गर्भवती स्त्रियांनी हा सूतककाळ रविवारी सकाळी ७ वाजून १७ मिनिटांपासून मानायला हवा. ग्रहणाच्या आरंभ काळात स्नान करावे, मध्यकाळात हवन आणि मोक्षकाळात पुन्हा स्नान करावे, असे ते म्हणाले. शुभ फळाच्या प्राप्तीसाठी गुरुमंत्र, सूर्यमंत्राचा जप तसेच इष्ट देवतांचे स्मरण आणि संकीर्तन करावे. अन्नदान व वस्त्रदानही करावे.
१९ नोव्हेंबरपासून चांगला काळ
सूर्यग्रहणाच्या कोविड-१९ महामारीवर पडणाºया प्रभावाबद्दल पं. चंद्रशेखर शर्मा म्हणाले, हे सूर्यग्रहण महामारी आटोक्यात आणेल. याचा परिणाम हळूवारपणे झालेला दिसेल, तर काही भागामध्ये अचानकपणे संक्रमण कमी होताना दिसेल. साधारणत: पुढील पाच महिन्यात महामारी बरीच घटून १९ नोव्हेंबरनंतर स्थिती सामान्य होईल.
ग्रहणाचा राशींवरील परिणाम
मेष - लाभ प्राप्ती
वृषभ - कार्यक्षेत्रात अडथळे
मिथुन - कष्टदायक
कर्क - कौटुंबिक चिंता
सिंह - लाभ प्राप्ती
कन्या - आनंदकारक
तुला - मानसिक चिंता
वृश्चिक - कष्टदायक
धनु - आरोग्यचिंता
मकर - सौख्यकारक
कुंभ - आरोग्यपीडा
मीन - शारीरिक कष्ट