६.९३ लाख नागरिकांना पहिला डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:07 AM2021-07-05T04:07:01+5:302021-07-05T04:07:01+5:30
२.२८ लाख लाभार्थींना दुसरा डोस : आज मनपा केंद्रावर कोविशिल्डचे लसीकरण नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात ...
२.२८ लाख लाभार्थींना दुसरा डोस : आज मनपा केंद्रावर कोविशिल्डचे लसीकरण नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात १८ पेक्षा अधिक वयोगटाचे लसीकरण २३ जूनपासून सुरू झाल्यापासून लसीकरणासाठी युवकांत उत्साह वाढला आहे. आजवर नागपूर शहरात एकूण सहा लाख ९२ हजार ६०३ लाभार्थींना पहिला डोस देण्यात आला, तर दोन लाख २८ हजार ५११ जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला व दुसरा डोस असे एकूण नऊ लाख २१ हजार ११४ डोस देण्यात आले आहेत.
६० वर्षांवरील नागरिकांना सर्वाधिक एक लाख ८५ हजार ४८ लाभार्थींना पहिला डोस देण्यात आला आहे. त्यानंतर १८ वर्षांवरील एक लाख ६८ हजार २२३ लाभार्थींना डोस देण्यात आले, तर ४५ वर्षांवरील एक लाख ५३ हजार ३०५ लाभार्थींना पहिला डोस देण्यात आला आहे. ४६ हजार ३६६ आरोग्यसेवक तर ५३ हजार ३२९ फ्रंटलाइन वर्कर्सला पहिला डोस देण्यात आला आहे. असे असले तरी मागणीनुसार लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरणावर परिणाम झाला आहे.
.....
नागपुरात लसीकरणाची अद्ययावत स्थिती ( ३ जुलै)
पहिला डोस
आरोग्यसेवक - ४६,३७७
फ्रंटलाइन वर्कर - ५३,३२९
१८ वयोगट - १,६८,२२३
४५ वयोगट -१,५३,३०५
४५ कोमार्बिड - ८६,२३१
६० सर्व नागरिक - १,८५,०४८
पहिला डोस - एकूण - ६,९२,६०३
दुसरा डोस
आरोग्यसेवक - २५,६६२
फ्रंटलाईन वर्कर - २३,३०१
१८ वयोगट - ८४६३
४५ वयोगट - ५५,९३८
४५ कोमार्बिड - २२,३१६
६० सर्व नागरिक -९२,८३१
दुसरा डोस - एकूण - २,२८,५११
संपूर्ण लसीकरण एकूण - ९,२१,११४
....
मनपा केंद्रामध्ये आज कोविशिल्डचे लसीकरण नाही
रविवारी सायंकाळपर्यंत शासनाकडून महापालिकेला कोविशिल्ड लस उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या कोविशिल्ड लसीकरण केंद्रावर आज सोमवारी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली. मात्र १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थनगर, आशीनगर झोनच्या मागे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय) व महाल येथील मनपाच्या स्व.प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे.