बहुतांश केंद्रांवर पहिला डोज कोविशिल्डचा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:34+5:302021-04-24T04:07:34+5:30
नागपूर : शहरात लसीकरणाने वेग घेतला आहे. केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र, काही ठिकाणी लसींचा साठा उपलब्ध नाही, ...
नागपूर : शहरात लसीकरणाने वेग घेतला आहे. केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र, काही ठिकाणी लसींचा साठा उपलब्ध नाही, तर काही केंद्रांवर मध्येच लस संपत आहे. बहुतांश केंद्रांवर पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना कोविशिल्ड ही लस दिली जात आहे, तर कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींनाच कोव्हॅक्सिनचा दुसरा डोज दिला जात आहे.
नागपूर शहरात सुमारे साडेचार लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ३ लाख ९३ हजार ७१४ नागरिकांनी पहिला डोज घेतला असून, ४ लाख ४७ हजार ३७४ नागरिकांचे दोन्ही डोज पूर्ण झाले आहेत.
ज्येष्ठ नागरिकही पुढे
- लसीकरणात ज्येष्ठ नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे. ६० वर्षांवरील १ लाख ५२ हजार ९४४ नागरिकांनी पहिला डोज घेतला आहे, तर १७ हजार ४४४ ज्येष्ठांनी दुसरा डोजही पूर्ण केला आहे.
युवकांमध्ये उत्सुकता
- १८ वर्षांवरील सर्वांना १ मे पासून लस दिली जाणार आहे. त्यामुळे युवकांमध्ये उत्साह असून, सोशल मीडियावर लसीकरणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. युवक केंद्रांवर जाऊन चौकशी करताना दिसत आहेत.
नागपूरात लसीकरणाची स्थिती (२२ एप्रिल)
पहिला डोज :-
आरोग्य सेवक - ४२१०८
फ्रंटलाईन वर्कर- ४०९८८
४५ वयोगट - ८६७३२५
४५ कॉमार्बिड - ७१३४९
६० सर्व नागरिक- १५२९४४
पहिला डोज - एकूण : - ३,९३,७१४
दुसरा डोज :-
आरोग्य सेवक - १७६७३
फ्रंट लाईन वर्कर- १०३६३
४५ वयोगट - ३६७९
४५ कॉमार्बिड - ४५०१
६० सर्व नागरिक- १७४४४
दुसरा डोज - एकूण - ५३६६०
संपूर्ण लसीकरण एकूण : -४,४७,३७४