नागपुरातून हज यात्रेकरूंचे पहिले उड्डाण २३ मे रोजी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:41 IST2025-04-05T11:40:11+5:302025-04-05T11:41:08+5:30

Nagpur : हज कमिटी ऑफ इंडियाने प्रसिद्ध केले हजयात्रेचे शेड्यूल

First flight of Haj pilgrims from Nagpur to be on May 23 | नागपुरातून हज यात्रेकरूंचे पहिले उड्डाण २३ मे रोजी होणार

First flight of Haj pilgrims from Nagpur to be on May 23

रियाज अहमद 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
यावर्षी २३ मे पासून नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेकरूंसाठी उड्डाण सुरू करण्यात आले आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने हजयात्रा २०२५ साठी जाण्याचा व परतण्याचा शेड्यूल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार २३ मे रोजी रात्री ११:२० वाजता विमानतळाहून पहिला यात्रेकरूंचा जत्था हजसाठी रवाना होणार आहे.


नागपुरातून जेद्दाह सौदी अरबसाठी हज यात्रेकरूंचे ५ विमान आहे. शेवटचे विमान ३० मे रोजी रात्री ३:२५ वाजताचे आहे. हज कमिटी ऑफ इंडियाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले की, या शेड्यूलमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. 


केंद्रीय हज समितीने प्रसिद्ध केलेल्या शेड्यूलनुसार ३० जूनपासून हज यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू होईल. यंदा महाराष्ट्रातून किमान १५ हजार यात्रेकरू हजला जाणार आहेत. यातील नागपूर इम्बार्केशन पॉइंटहून २ हजार हजयात्री रवाना होणार आहे. त्यासाठी नागपूर हज हाउसमध्ये २१ मे पासून हज यात्रेकरून रिपोर्टिंग करावी लागणार आहे.


नागपूरहून हजसाठी विमानांचे शेड्यूल
विमान                            तिथी                   उड्डाणाचा वेळ

1- एक्सवाय-८२२२            २३ मे                 रात्री ११:१० वाजता.
२ - एक्सवाय ८२२८           २५ मे                 रात्री ११:२० वाजता.
३-एक्सवाय ८१५६             २६ मे                 रात्री ११:२० वाजता.
४ - एक्सवाय ८२३४           २७ मे                 रात्री ११:२० वाजता.
५ - एक्सवाय ८२४०           ३० मे                  रात्री ३:२५ वाजता.


फ्लायनास एअरलाइन्सने भरणार उड्डाण
केंद्रीय हज समितीनुसार हज यात्रेकरूंची रवानगी व परत येण्याचा कार्यक्रमांतर्गत फ्लायनास एअरलाइनच्या माध्यमातून हज यात्रेकरूंना विमान सेवा प्रदान करण्यात येणार आहे. फ्लायनास एअरलाइनच्या विमानाची प्रवासी क्षमता ४३० आहे.


 

Web Title: First flight of Haj pilgrims from Nagpur to be on May 23

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.