हज यात्रेसाठी नागपुरातून पहिला जत्था रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:38 AM2019-07-18T11:38:04+5:302019-07-18T11:38:42+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी मध्यरात्री हज यात्रेसाठी २४८ यात्रेकरूंचा पहिला जत्था मक्का-मदिनाकडे रवाना झाला.

The first group left from Nagpur for Haj Yatra | हज यात्रेसाठी नागपुरातून पहिला जत्था रवाना

हज यात्रेसाठी नागपुरातून पहिला जत्था रवाना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बुधवारी मध्यरात्री हज यात्रेसाठी २४८ यात्रेकरूंचा पहिला जत्था मक्का-मदिनाकडे रवाना झाला. हज यात्रेकरूंना रवाना करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, मित्र, नातेवाईकांसह मुस्लिम समुदाय मोठ्या संख्येने हज हाऊस आणि विमानतळ परिसरात उपस्थित होते. प्रत्येक मुस्लिम बांधवाची जीवनात एकदा हज करण्याची इच्छा असते. बुधवारी मध्यरात्री यात्रेकरूंचा उत्साह चेहऱ्यावर झळकत होता. बुधवारी रात्री ९.१५ वाजता हज समितीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी हज हाऊसमधून हज यात्रेकरूंच्या पहिल्या जत्थ्याला हिरवी झेंडी दाखवून विमानतळासाठी रवाना केले. नागपुरातून ३१ जुलैपर्यंत हज यात्रेकरू जाणार आहेत. या काळात विदर्भासह छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून एकूण ३ हजार ३२१ हज यात्रेकरू रवाना होतील. हज यात्रेकरूंच्या रवानगी कार्यक्रमासाठी हज हाऊसमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: The first group left from Nagpur for Haj Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.