पहिले भारतीय संविधान साहित्य संमेलन आजपासून : दीक्षाभूमी येथे सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:22 AM2019-06-08T00:22:21+5:302019-06-08T00:24:11+5:30
संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. किशोर रोही हे संमेलनाचे अध्यक्ष असतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संविधानातील विकासात्मक, कल्याणकारी आणि सामाजिक न्यायाचा विचार लोकांपर्यंत पोहोचविणे हा उद्देश ठेवून पहिल्या भारतीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ८ व ९ जून रोजी नागपुरात होऊ घातले आहे. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग हे या संमेलनाचे उद्घाटक असून, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. किशोर रोही हे संमेलनाचे अध्यक्ष असतील.
माजी सनदी अधिकार ई. झेड. खोब्रागडे यांच्या पुढाकारातून संविधान फाऊंडेशनतर्फे आयोजित संमेलनाचे दीक्षाभूमीवरील ऑडिटोरियममध्ये सकाळी १० वाजत उद्घाटन होईल. संमेलन स्वागताध्यक्षा रेखा खोब्रागडे या आहेत. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात संविधानिक हक्क व कर्तव्याला धरून विविध विषयांवर चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन केले जाणार आहे. उद्घाटनीय सत्रात अन्न व औषध विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, ‘यशदा’चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड विशेष अतिथी असतील. यावेळी भारतीय सनदी सेवेतील १९५६ च्या तुकडीचे ज्येष्ठ सनदी अधिकारी पी. एस. कृष्णन (दिल्ली) यांचा प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार केला जाईल.
दुर्बल घटकांच्या संवाद सत्रात नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमनच्या सचिव अॅनी राजा, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. कुमकुम सिरपूरकर, सामाजिक कार्यकर्त्या समीना शेख, उद्योग विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, ज्येष्ठ सनदी अधिकारी पी. एस. कृष्णन, नागालॅण्डचे पोलीस महानिरीक्षक संदीप तामगाडगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. फिरदोस मिर्झा, जनमंचचे प्रा. शरद पाटील, गुजरातचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनिल प्रथम, भविष्य निर्वाह आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे, आयकर विभागाचे सहआयुक्त अजय ढोके, प्रो. विमल थोरात, औरंगाबाद येथील सामाजिक कार्यकर्ता सिद्धार्थ मोकणे, अतुल खोब्रागडे व श्वेता उंबरे सहभागी होतील. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, क्रांती खोब्रागडे(आयआरएस), डॉ. जीवन बच्छाव (आयआरएस), पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार, सचिन ओंबासे, स्वच्छंद चव्हाण(आयआरएस), हे युवा सनदी अधिकारी सहभागी होतील. ज्येष्ठ कवी इ. मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे. ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता न्या. किशोर रोही यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. यात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया, दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त सुनीलकुमार गौतम, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. शंकर खोब्रागडे आदी उपस्थित असतील.