सिकलसेल रुग्णाचे पहिले ‘किडनी ट्रान्सप्लांट’

By admin | Published: December 27, 2016 02:55 AM2016-12-27T02:55:50+5:302016-12-27T02:55:50+5:30

आई आणि मुलगा दोन्ही सिकलसेलचे रुग्ण. मात्र दोघांचेही रक्तगट जुळत होते. इतर पर्यायही उपलब्ध

First 'kidney transplant' for sickle cell | सिकलसेल रुग्णाचे पहिले ‘किडनी ट्रान्सप्लांट’

सिकलसेल रुग्णाचे पहिले ‘किडनी ट्रान्सप्लांट’

Next

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : आईने दिले मुलाला जीवनदान
नागपूर : आई आणि मुलगा दोन्ही सिकलसेलचे रुग्ण. मात्र दोघांचेही रक्तगट जुळत होते. इतर पर्यायही उपलब्ध नव्हते. अशावेळी अत्यंत जोखीम घेऊन डॉक्टरांनी आईचे मूत्रपिंड मुलामध्ये यशस्वीपणे प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लांट) केले. राज्यातील शासकीय रुग्णालयात सिकलसेल रुग्णावरील ही पहिली शस्त्रक्रिया असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ मध्ये एका ‘हिपॅटायटिस सी’ग्रस्ताच्या यशस्वी किडनी ट्रान्सप्लांटला १५ दिवस होत नाही तोच सोमवारी या अवघड शस्त्रक्रियेमुळे ‘सुपर’चे नाव उंचावले आहे.
रक्ताशी संबंधित आणि अतिशय वेदनादायी आजार म्हणून सिकलसेलला ओळखल्या जाते. हा आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो. हा आजार वाहक आणि रुग्ण अशा दोन गटांत विभागल्या जातो. सिकलसेलग्रस्तांना आयुष्यभर असह्य वेदना होतात. रुग्णाच्या तुलनेत वाहकाच्या वेदना कमी असतात.
नागपुरातील नंदनवन भागातील रहिवासी असलेल्या संदीप उके या सिकलसेलच्या रुग्णालाही या दुखण्यातून जावे लागत होते. यातच या तरुणाला किडनी विकार जडला. त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान झाले. तो डायलिसिसवर जगत होता. आपल्या मुलाची ही अवस्था आई वनमाला उके यांना अस्वस्थ करीत होती. तिने मुलाला किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.
तपासण्या झाल्या. मात्र मुलगा आणि माता दोघेही ‘ए एस पॅटर्न’(वाहक)मधील सिकलसेलने पीडित असल्याचे निदर्शनास आले. मात्र रक्तगट जुळत होता. अशा रुग्णाचे किडनी प्रत्यारोपण करणे हे अतिशय जोखीमीचे कार्य ठरते. परंतु डॉक्टरांनी ही जोखीम पत्कारली. सिकलसेल वाहक असलेल्या दोघांच्याही किडनीचे प्रत्यारोपण केले.

Web Title: First 'kidney transplant' for sickle cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.