पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, काँग्रेसला भोपळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 02:58 PM2019-06-24T14:58:22+5:302019-06-24T16:28:25+5:30

भाजपाने 19 पैकी 17 नगरसेवक जिंकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे.

In the first municipal elections, the lotus opened, Congress has a pumpkin | पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, काँग्रेसला भोपळा

पहिल्याच नगरपालिका निवडणुकीत कमळ फुललं, काँग्रेसला भोपळा

googlenewsNext

नागपूर – स्थानिक स्वराज संस्थांमध्ये विजय मिळवण्याची भाजपाची घोडदौड सुरूच आहे. परभणीतील मानवत आणि नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदच्या निवडणुकीत भाजपचं कमळ फुललं आहे. नागपूरमधील बुटिबोरी नगरपरिषदेत भाजपचा एकतर्फी विजय झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसला येथे भोपळा म्हणजे एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. नगराध्यक्षपदी भाजपचे बबलू गौतम विजयी झाले आहेत. 

भाजपाने 19 पैकी 17 नगरसेवक जिंकले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 जागांवर विजय झाला आहे. विशेष म्हणजे बुटीबोरी नगर परिषद स्थापनेनंतर ही पहिलीच निवडणूक घेण्यात आली. तसेच परभणीतील मानवतच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे सखाहरी पाटील विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या पूजा खरात यांचा त्यांनी 9 हजार 439 मतांनी पराभव केला आहे. पाटील यांना 12 हजार 210 तर खरात यांना मिळाली 2 हजार 771 मते मिळाली आहेत.

नागपूर जिल्ह्यात नव्यानेच स्थापन झालेल्या बुटीबोरी नगर परिषद निवडणूकीत नगराध्यक्ष पदासह १६ जागावर भाजपने दमदार यश मिळविले आहे. 
नगराध्यक्ष पदाच्या निवडणूकीत भाजपचे राजेश (बबलु) मनोरंजन गौतम यांनी ६ हजार ९४७ मते मिळवित राष्ट्रवादीचे रामनारायण  (बल्लू) दशरथ श्रीवास यांचा ३ हजार ८६१ मतांनी पराभव केला. श्रीवास यांना ३०८६ मते मिळाली. काँग्रेसचे जाकीर (बाबू) सलाम पठाण यांना ३०२४ मते मिळाली. 
बुटीबोरी नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक रविवारी पार पडली. यात नगराध्यक्ष आणि नऊ प्रभागातील १८ नगरसेवकांच्या निवडीसाठी एकूण २३,६६० मतदारांपैकी १४,७५७ मतदारांनी (६२.१० टक्के) मतदानाचा हक्क बजाविला होता.

नगराध्यक्ष पदासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात तिरंगी लढत झाली. येथे भाजप आणि सेनेची युती होती. कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढण्याने भाजप-सेना युतीला विजय खेचण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीला येथे केवळ दोन जागावर यश मिळाले. काँग्रेसला मात्र एकाही जागेवर विजय मिळविता आला आहे. प्रदेश कॉँग्रेसचे सचिव मुजीब पठाण यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने येथे निवडणूक लढविली होती. त्यांचे बंधू जाकीर पठाण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते. 

भाजपकडून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी किल्ला लढविला. सेनेशी युती करण्यापासून तर उमेदवार जाहीर करेपर्यंत भाजपचे नियोजन होते. बुटीबोरीत कॉँग्रेस सुरुवातीपासूनच एकाही होती. कॉँग्रेस-राष्ट्रवादीने ही निवडणूक एकत्र लढावी यासाठी जिल्ह्यातील एकाही मोठ्या नेत्याने पुढाकार घेतला नाही. शेवटी पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीकडून माजी मंत्री रमेश बंग यांनी ताकद लावली. त्यांना दोन जागा मिळविण्यात यश आले.

Web Title: In the first municipal elections, the lotus opened, Congress has a pumpkin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.