मेट्रो रेल्वेचे पहिले आॅनलाईन टेंडर

By admin | Published: April 18, 2015 02:29 AM2015-04-18T02:29:10+5:302015-04-18T02:29:10+5:30

नागपूर शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मूर्तरूप देण्याच्या दृष्टीने पहिले आॅनलाईन टेंडर जारी करण्यात आले आहे.

First online train tender for Metro rail | मेट्रो रेल्वेचे पहिले आॅनलाईन टेंडर

मेट्रो रेल्वेचे पहिले आॅनलाईन टेंडर

Next

आनंद शर्मा नागपूर
नागपूर शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मूर्तरूप देण्याच्या दृष्टीने पहिले आॅनलाईन टेंडर जारी करण्यात आले आहे. यामुळे १५ जूनपासून विमानतळ सेक्शन अंतर्गत शिवणगाव रोड ते मिहान पर्यंत दोन पूल आणि कम्पाऊंड वॉलचे बांधकाम सुरू होण्याची शक्यता आहे. या ८० कोटी रुपयाच्या टेंडरला शनिवारी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएमआरसीएल)च्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे. यानंतर किमान महिनाभरात निविदा देण्याचा निर्णय घेण्यात येईल.
एनएमआरसीएलचे प्रबंध संचालक बृजेश दीक्षित हे या पहिल्या टेंडरला मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दृष्टीने टाकलेले एक मोठे पाऊल म्हणून पाहात आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, यामुळे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम प्रत्यक्ष जमिनीस्तरावर सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार वर्धा रोडवर नागपूर विमानतळ सेक्शनमध्ये शिवणगाव रोड ते मिहानच्या शेवटपर्यंत ४.५ किलोमीटर क्षेत्रात २० मीटर रुंद सुरक्षा भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीची उंची ५ फूट राहील. याशिवाय याच परिसरात दोन पूलसुद्धा बांधण्यात येतील. यानंतर मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी या सुरक्षा भिंतीमध्ये ट्रॅक तयार करण्यात येईल. या कामासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकोडून एनएमआरसीएलला ३७ हेक्टर जमीन मिळाली आहे.
दिल्लीवरून आले राईट्सचे अधिकारी
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प साकार करण्यासाठी जागतिक निविदेंतर्गत जनरल कन्सलटंट नियुक्त केले जातील. यासाठी राईट्स आणि दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला अंतरिम कन्सलटंट बनविण्यात आले आहे. राईट्सचे अधिकारी कामाला लागले आहेत. दिल्लीवरून राईट्सचे अधिकारी ए.के. शर्मा हे नागपुरात आले आहेत. ते जनरल कन्सलटंटच्या नियुक्तीच्या दृष्टीने नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि राईट्स यांच्या दरम्यान झालेल्या कराराला संक्षिप्तपणे समजून घेत आहेत.

Web Title: First online train tender for Metro rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.