पहिल्या टप्प्यात ३,५०० बालकांना पाेलिओ डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:33+5:302021-02-05T04:37:33+5:30
सावनेर : राष्ट्रीय पल्स पाेलिओ लसीकरणाचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. यात सावनेर शहरातील ३,५०० बालकांना पाेलिओ डाेस देण्यात ...
सावनेर : राष्ट्रीय पल्स पाेलिओ लसीकरणाचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. यात सावनेर शहरातील ३,५०० बालकांना पाेलिओ डाेस देण्यात आला, अशी माहिती सावनेर येथील शासकीय रुग्णालयाचे प्रपाठक डाॅ. पवन मेश्राम यांनी दिली.
३१ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेले हे अभियान यशस्वी करण्यासाठी सावनेर शहरात १९ स्थायी व दाेन फिरत्या पथकांनी निर्मिती करण्यात आली हाेती. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. या पथकांनी सावनेर शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, मंदिरे, इतर सार्वजनिक ठिकाणांसह घराेघरी जाऊन पाच वर्षांखालील मुला-मुलींना पाेलिओ डाेस पाजला. या कार्यात प्रपाठक डॉ. पवन मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. संदीप गुजर, डॉ. अभिनव कळमकर, डॉ. शुभ्रा जोशी, डॉ. हरिष बरय्या, सुनीता येटे, अमोल घटे, मनीष खरोणे, खंते, अतुल पारधी, शैलेश वहाणे, घनश्याम तुर्के, नीलेश राठोड, किशोर गोमकाळे, विजय खिल्लारी, गुणेश्वर ठाकरे, बेबी भेलावी, गणेश चांदेकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.