पहिल्या टप्प्यात ७५ टक्के पोलिसांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:07 AM2021-03-23T04:07:38+5:302021-03-23T04:07:38+5:30
पहिल्या टप्प्यात ७५ टक्के पोलिसांचे लसीकरण दुसऱ्या टप्प्याची सुरुवात : महिला पोलिसांची संख्या लक्षणीय लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...
पहिल्या टप्प्यात ७५ टक्के पोलिसांचे लसीकरण
दुसऱ्या टप्प्याची सुरुवात : महिला पोलिसांची संख्या लक्षणीय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना वारियर्स म्हणून पुढे आलेल्या शहर पोलीस दलातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पोलिसांचे लसीकरण पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले आहे.
शहर पोलीस दलात आठ हजार पोलीस सेवारत आहेत. यातील ६२२३ अर्थात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पोलिसांनी पहिल्या टप्प्यात लस घेतली आहे.
नागपूर पोलीस दलात दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणालाही प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात १० टक्के पोलिसांचे लसीकरण झाले आहे. ही संख्या आता झपाट्याने वाढणार आहे.
----
एकूण पोलीस ८०००
पैकी पहिला डोस घेणारे : ६२२३
ज्यात
पुरुष : ४९९३
महिला : १२३०
--
दुसरा डोस : ७१२पोलीस
पुरुष : ६४५
महिला : ६७
----
एकूण पोलीस अधिकारी - १०००
लस घेतलेले पोलीस अधिकारी - ९००
---
१२३० महिला पोलिसांनी घेतली लस
लस घेणाऱ्यांमध्ये महिला पोलिसांचेही प्रमाण लक्षणीय आहे. एकूण १२३० महिला पोलिसांनी पहिल्या टप्प्यात तर दुसऱ्या टप्प्यात ६७ महिला पोलिसांनी लस घेतली आहे.
--
१० टक्के पोलिसांनी घेतला दुसरा डोस
आजपर्यंत ७१२
पोलिसांनी लसीचा दुसरा डोस घेतला.
---
उस्फूर्त प्रतिसाद
पोलीस दलात लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे स्वतःहूनच पोलीस अधिकारी, कर्मचारी लस घेत आहेत.
- डॉ. संदीप शिंदे
पोलीस हॉस्पिटल, नागपूर