प्रथमच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी अनुकूल सरकार मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:01 IST2020-02-28T13:01:31+5:302020-02-28T13:01:54+5:30
फडणवीस सरकार अंधश्रद्धेशी कटिबद्ध असल्याने जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी टाळाटाळ केली जात होती. मात्र नवे सरकार हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनुकूल असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. श्याम मानव यांनी येथे व्यक्त केले आहे.

प्रथमच अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामासाठी अनुकूल सरकार मिळाले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: फडणवीस सरकार अंधश्रद्धेशी कटिबद्ध असल्याने जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी टाळाटाळ केली जात होती. मात्र नवे सरकार हे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनुकूल असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रो. श्याम मानव यांनी येथे व्यक्त केले आहे. नागपुरात आयोजित राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते.
नव्या सरकारची कटिबद्धथता ही अंधश्रद्धेच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही सुरुवात केली आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल. आपल्याला आता जोमाने काम करायचे आहे. प्रथमच कामाला अनुकूल असे सरकार प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे कोणत्याच पूजापाठमध्ये नसतात. मात्र एकदाच त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा केल्याचे मानव पुढे म्हणाले.