दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच ५१५ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:18 AM2020-12-03T04:18:07+5:302020-12-03T04:18:07+5:30

नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढून ती कमी होत असताना मंगळवारी ५१५ बाधितांची नोंद झाली. तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांची ...

For the first time in a month and a half, 515 patients have been added | दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच ५१५ रुग्णांची भर

दीड महिन्यानंतर पहिल्यांदाच ५१५ रुग्णांची भर

Next

नागपूर : दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढून ती कमी होत असताना मंगळवारी ५१५ बाधितांची नोंद झाली. तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांची संख्या ५०० वर गेली. विशेष म्हणजे, आज पाच हजाराखाली चाचण्या झाल्या. मात्र, दैनंदिन संख्येत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. रुग्णांची एकूण संख्या १,१२,२८० झाली असून ९ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३,६८१ वर पोहचली आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात रुग्णांची वाढलेली संख्या ऑक्टोबरमध्ये कमी होऊ लागली. १७ ऑक्टोबर रोजी ५४० रुग्णसंख्येच्या नोंदीनंतर ३० नोव्हेंबरपर्यंत ५०० वर रुग्णसंख्या गेली नव्हती. परंतु महिन्याच्या सुरुवातीलाच रुग्णसंख्येने हा आकडा गाठल्याने नागरिकांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज शहरात ३,९०७ संशयित रुग्णांची आरटीपीसीआर तर १,०६५ रुग्णांचे रॅपिड ॲन्टिजेन मिळून ४,९७२ चाचण्या झाल्या. इतर दिवसाच्या तुलनेत या चाचण्या कमी आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४१७, ग्रामीणमधील ९४ तर जिल्हाबाहेरील ४ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील तीन, ग्रामीणमधील दोन तर जिल्हाबाहेरील चार आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत कमी ३९९ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनावर मात करणाऱ्यांची एकूण संख्या १,०३,५६६ झाली आहे.

-अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या पाच हजारावर

अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मागील दोन दिवसात पाच हजाराच्या खाली आली असताना मंगळवारी पुन्हा ५,०३३ वर गेली आहे. यातील ४,३२१ रुग्ण शहरातील असून, ७१२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. १,५४७ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात तर ३,४८७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. वाढत्या रुग्णांमुळे कोरोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

:: कोरोनाची आजची स्थिती

- दैनिक संशयित : ४९७२

- बाधित रुग्ण : ११२२८०

- बरे झालेले : १०३५६६

- उपचार घेत असलेले रुग्ण : ५०३३

- मृत्यू : ३६८१

Web Title: For the first time in a month and a half, 515 patients have been added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.