मनोरुग्णांचे पहिल्यांदाच लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:08 AM2021-06-20T04:08:06+5:302021-06-20T04:08:06+5:30
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा फटका प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांनाही बसला होता. जवळपास ५०वर रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. कर्मचाऱ्यांनाही लागण ...
नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा फटका प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांनाही बसला होता. जवळपास ५०वर रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. कर्मचाऱ्यांनाही लागण झाली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्याने मोठा धोका टळला. भविष्यात रुग्णांमध्ये हा आजार गंभीर होऊ नये यासाठी शनिवारी मनोरुग्णालयातील ७५ पुरुष व १४३ स्त्रिया अशा एकूण २१८ निराधार व मनोरुग्ण लाभार्थींना कोव्हिडशिल्ड लसीकरणाचा प्रथम डोज देण्यात आला.
मनपाचा मंगळवारी झोन कार्यालयाच्यावतीने गोरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाने हे लसीकरण केले. यावेळी मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे व झोनल वैद्यकीय अधिकारी अतिक उर रहेमान खान उपस्थित होते. या शिबिराला यशस्वी करण्यााठी डॉ. श्रीकांत करोडे, डॉ. जोत्स्ना गलाट, डॉ. आशिष कुथे, डॉ. पंकज बागडे, डॉ. माधुरी मेश्राम, डॉ. अमोल चव्हाण (मनोचिकित्सक), डॉ. सूर्यकांत ढेंगरे, रिना खुरपुडी, श्रध्दा यादव, ज्योती फिस्के, अनघा राजे, मधुमती मंथनवार, राजेश खरे, अलका महाजन, मानवटकर, कुणाल बिरहा, केवल शेंडे, धर्मेंद्र मोरे, गुंजन शेंडे, आर्यन बिनकर, साक्षी ठाकरे यांनी परिश्रम घेतले.