डेंग्यूचा पहिला बळी

By admin | Published: September 28, 2014 01:02 AM2014-09-28T01:02:32+5:302014-09-28T01:02:32+5:30

शहरात डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद महापालिकेने घेतली आहे. मात्र याचा अहवाल यायला तब्बल २७ दिवसांची प्रतीक्षा मनपाला करावी लागली. सध्या डेंग्यूचे ९२ रुग्ण पॉझिटीव्ह आले. दीनदयालनगर

First victim of dengue | डेंग्यूचा पहिला बळी

डेंग्यूचा पहिला बळी

Next

दीनदयालनगरातील घटना : २७ दिवसानंतर मिळाला अहवाल
नागपूर : शहरात डेंग्यूच्या पहिल्या बळीची नोंद महापालिकेने घेतली आहे. मात्र याचा अहवाल यायला तब्बल २७ दिवसांची प्रतीक्षा मनपाला करावी लागली. सध्या डेंग्यूचे ९२ रुग्ण पॉझिटीव्ह आले. दीनदयालनगर येथील रहिवासी धरित्री विनय भट्टलवार (८) मृताचे नाव आहे.
सोमलवार निकालस शाळेची वर्ग ४ ची विद्यार्थिनी असलेली धरित्री एकुलती एक मुलगी होती. आई-वडिलांकडून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या धरित्रीला २१ आॅगस्टला ताप आला. तेव्हापासून तिच्यावर शर्थीचे उपचार सुरू होते. खासगी पॅथालॉजीने ती डेंग्यू पॉझिटीव्ह असल्याचा अहवालही दिला होता. एका खासगी इस्पितळात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू ३१ आॅगस्ट रोजी झाला. याची नोंद महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने घेतली. तिच्या रक्ताचे नमुने ‘इलिझा’ चाचणीसाठी मेयोच्य प्रयोगशाळेत पाठविले. परंतु काही दिवसांतच त्यांच्याकडील ‘इलिझा रिडर’ यंत्र बंद पडले. यामुळे तिचे नमुने त्यांच्याकडेच राहिले. दरम्यान मनपाने डेंग्यू संशयित रक्ताचे नमुने डागा रुग्णालयाकडे पाठविणे सुरू केले. तब्बल २७ दिवसानंतर धारित्रीच्या नमुन्याची तपासणी झाली. यात तिला डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. आता हिवताप व हत्तीरोग विभाग हा अहवाल मनपाच्या आरोग्य विभागासमोर ठेवणार आहे. मनपाने जानेवारी २०१४ ते आतापर्यंत ५६० नमुन्यांची तपासणी केली, यात ९२ जणांना डेंग्यू असल्याचे निदान झाले आहे. मनपातर्फे घराघरांची झाडाझडती घेऊन डेंग्यूवर जनजागृती सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: First victim of dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.