अगोदर व्हॉट्सअपवर मॅसेजेस अन् नंतर विनयभंग
By योगेश पांडे | Updated: November 3, 2023 17:27 IST2023-11-03T17:17:12+5:302023-11-03T17:27:18+5:30
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

अगोदर व्हॉट्सअपवर मॅसेजेस अन् नंतर विनयभंग
नागपूर : परिचयातीलच तरुणीला अगोदर व्हॉट्सअपवर मॅसेजेस पाठवून त्रास दिला व त्यानंतर आरोपीने तिचा घरासमोर येऊन विनयभंग केला. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
तोरण मिलुराम शाहू (२८, पारडी) असे आरोपीचे नाव आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीशी त्याची ओळख होती. ओळखीचा फायदा घेत त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने त्याच्या बोलणे कमी केले. तो तिचा पाठलाग करू लागला. त्याने ऑक्टोबर महिन्यापासून वारंवार तिच्या व्हॉट्सअपवर मॅसेजेस पाठविणे सुरू केले. त्यानंतर काही दिवसांअगोदर तो तिच्या घरासमोर येऊन धडकला व तिला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने भर दुपारी घरासमोरच तिचा विनयभंग केला. यामुळे तरुणी धास्तावली व तिने घरच्यांना हा प्रकार सांगितला. अखेर तिने लकडगंज पोलीस ठाण्यात तोरणविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक केली आहे.