नागपुरात  घातक शस्त्रांसह पाच आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:32 PM2019-03-19T23:32:19+5:302019-03-19T23:33:21+5:30

घातक शस्त्रांसह मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या पाच गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्याची कामगिरी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने बजावली. यामुळे शहरातील एक मोठा गुन्हा टळल्याचे बोलले जाते.

Five accused with deadly weapons arrested in Nagpur |  नागपुरात  घातक शस्त्रांसह पाच आरोपी जेरबंद

 नागपुरात  घातक शस्त्रांसह पाच आरोपी जेरबंद

Next
ठळक मुद्देभांडणाचा बदला घेण्यासाठी निघाले होते : परिमंडळ पाचच्या पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घातक शस्त्रांसह मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या पाच गुन्हेगारांना वेळीच जेरबंद करण्याची कामगिरी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने बजावली. यामुळे शहरातील एक मोठा गुन्हा टळल्याचे बोलले जाते.
अब्दुल शफीक अब्दुल हफीज (वय ३२), सुभान अब्दुल रफीक अब्दुल हफीज (वय ३४), मोहम्मद इरफान अब्दुल वहाब (वय ४१), शेख नजीर शेख बशीर आणि मोहम्मद शकील मोहम्मद शब्बीर (वय ३१, रा. सुफियानगर), अशी आरोपींची नावे आहेत. त्यातील काही कबाडीचा व्यवसाय करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी शफीकचे वडील हफीज यांच्यासोबत एका व्यक्तीचा वाद झाला. त्याचा बदला घेण्यासाठी शफीकने घातक शस्त्रांसह आपल्या साथीदारांना कारमध्ये बसवून तो सोमवारी रात्री यशोधरा नगरातील शेरे पंजाब लॉनकडे निघाला. ही माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून लगेच पोलीस पथकाने तिकडे धाव घेऊन आरोपींचे वाहन अडवले. आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील तलवार, चाकू, मोबाईल आणि कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
मोठा गुन्हा टळला
पोलिसांनी सतर्कता दाखविल्यामुळे हे आरोपी गुन्हा करण्यापूर्वीच पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे मोठा गंभीर गुन्हा टळला. पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद धोंगडे, माधव शिंदे तसेच राजकुमार जनबंधू, पंकज लांडे, सूरज भारती, दिनेश यादव, प्रभाकर मानकर, विनोद सोनटक्के, रवींद्र राऊत, मृदुल नगरे आणि अशोक दुबे यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Five accused with deadly weapons arrested in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.