पाच दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:08 AM2021-08-01T04:08:07+5:302021-08-01T04:08:07+5:30

नागपूर : घरासमोर लॉक करून ठेवलेल्या पाच दुचाकी अज्ञात आरोपीने जाळल्याची घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवनगरमध्ये शुक्रवारी रात्री ...

Five bikes burned | पाच दुचाकी जाळल्या

पाच दुचाकी जाळल्या

Next

नागपूर : घरासमोर लॉक करून ठेवलेल्या पाच दुचाकी अज्ञात आरोपीने जाळल्याची घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवनगरमध्ये शुक्रवारी रात्री ११.४५ ते शनिवारी रात्री ३.४५ दरम्यान घडली. मुकेशकुमार मखनलाल सैनी (३१) रा. प्लॉट नं. ७९, शिवनगर यांनी आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ३१, ई. एच-७५६४, बजाज प्लॅटिना क्रमांक एम. एच. ३१, बी. झेड-१९६४, स्प्लेंडर गाडी क्रमांक एम. एच. ३१, बी. वाय-९५१५, टीव्हीएस अ‍ॅक्सेस क्रमांक एम. एच. ४९, के. आर-३०१९ आणि अ‍ॅक्टिव्हा क्र. एम. एच. ४९, बी. ए-९५३९ या सर्व गाड्या घरासमोर लॉक करून ठेवल्या होत्या. अज्ञात आरोपीने सर्व गाड्यांना आग लावून गाड्यांचे ९० हजाराचे नुकसान केले. पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

...............

इलेक्ट्रिकल कंपनीने केली जीएसटीच्या रकमेत अफरातफर

नागपूर : अंबाझरी ठाण्यांतर्गत रामकृष्ण इलेक्ट्रिकल कंपनीच्या संचालकांनी जीएसटीच्या रकमेत अफरातफर केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपींमध्ये टिळकनगर येथील रहिवासी सुब्रमण्यम रामलिंगन अय्यर, रामलिंगन अय्यर, सुभांश्री अय्यर, अभय शरद वकरे, राजाराम शेखर, सुंदरम श्रीनिवास हे कंपनीचे संचालक आहेत. तर आरोपी ओमप्रकाश घवघवे रा. भिलगाव कामठी रोड हा कंपनीत मुख्य लेखापाल आहे. कंपनीच्या संचालकांनी ऑगस्ट २०१८ ते ऑगस्ट २०१९ दरम्यान हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स सामानाच्या खरेदीवर जीएसटीची वसुली केली होती. परंतु कंपनीच्या वतीने जीएसटी विभागात रक्कम भरण्यात आली नाही. सोबतच रामकृष्ण इलेक्ट्रिकल कंपनीला लोखंड, हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल सामानाचा पुरवठा करणारे व्यावसायिक अतुल अग्रवाल रा. रहाटे कॉलनी वर्धा यांना सामानाची थकीत रक्कम २२ लाख ५३ हजार रुपये दिले नाहीत. अग्रवाल यांनी पैसे मागितले असता त्यांना पाहून घेण्याची धमकी दिली. अग्रवाल यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

...............

Web Title: Five bikes burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.