विज काेसळून पाच बैल, वासराचा हाेरपळून मृत्यू

By निशांत वानखेडे | Published: April 19, 2023 08:13 PM2023-04-19T20:13:41+5:302023-04-19T20:13:52+5:30

नागपूर जिल्ह्यात अवकाळीच्या वादळाचा कहर : शहरातही पडझड

Five bulls were struck by lightning, a calf also died in nagpur | विज काेसळून पाच बैल, वासराचा हाेरपळून मृत्यू

विज काेसळून पाच बैल, वासराचा हाेरपळून मृत्यू

googlenewsNext

नागपूर: मंगळवारी दिवसा उन्हाचा ताप दिल्यानंतर रात्री अवकाळीच्या वादळाने जिल्ह्यात काही ठिकाणी कहर केला. भिवापूर तालुक्यातील नांद (सुकळी) या गावी शिवारात विज पडल्याने गाेठ्याला आग लागल्याने पाच बैल आणि वासरू जळून खाक झाले. याच तालुक्यात वादळामुळे आंब्याच्या बागाही झडल्या. दरम्यान शहरातही मध्यरात्रीच्या वादळामुळे झाडांच्या फांद्या व बॅनर उन्मळून पडल्याची माहिती आहे.

मध्यरात्रीच्या सूमारास अचानक वादळाचा तडाखा व विजांचे गर्जन सुरू झाले. यामुळे विद्युतही खंडित झाली. यातच प्रचंड गर्जनासह विज या गाेठ्यावर काेसळली आणि गाेठ्याला आग लागली. गाेठ्यातील वैरण आणि इतर साहित्यानी पेट घेतला. अशात गाेठ्याची छत बैलांच्या अंगावर पडली व या आगीत पाच बैल व वासराचा जागीच हाेरपळून मृत्यू झाला. हा गाेठा बंदिस्त असल्याने जनावरांना बाहेर पळता आले नसल्याचे बाेलले जात आहे. एक बैल व गाय बाहेर पडले पण तेही हाेरपळले असून त्यांच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार केले जात असल्याची माहिती आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारासह सरपंच यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

वादळामुळे आंब्याची बाग झळली

याच तालुक्यात भगवानपूर परिसरात झालेल्या वादळामुळे आंब्याच्या बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री १२ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. झाडांवरील आंबे मोठ्या प्रमाणात गळून पडले. भगवानपूरला डॉ. नामदेव राऊत यांची सहा एकरांत आंब्यांची बाग आहे. तसेच बांधावरसुद्धा शेतकऱ्यांनी आंबालागवड केली आहे. त्यांचेही वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पारा ४२ अंशावर
ढगांच्या गर्दीने अवकाळीचे वातावरण असतानाही पाऱ्याने बुधवारी उसळी घेतली. आदल्या दिवशी ४१.२ अंशावर असलेले नागपूरचे तापमान बुधवारी ४२ अंशावर पाेहचले. मात्र ढगाळ वातावरणामुळे उन्हाचे तीव्र चटके जाणवत नसले तरी उकाड्याने नागरिकांना त्रस्त केले आहे. या सिजनमधले हे सर्वाधिक तापमान ठरले आहे. विदर्भातही बहुतेक जिल्ह्यात दिवसाचा पारा ४२ अंशावर आहे. ब्रम्हपुरीत तब्बल ४३.८ अंशाची नाेंद झाली, जी राज्यात सर्वाधिक आहे.

Web Title: Five bulls were struck by lightning, a calf also died in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर