नागपुरातील आपली बसचे पाच वाहक बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:57 AM2018-09-30T00:57:51+5:302018-09-30T00:58:52+5:30

शहरात धावणाऱ्या २०६ बसची शुक्र वारी अकस्मात करण्यात आलेल्या तपासणीत महापालिका अधिकाऱ्यांना पाच बस वाहकांनी पैसे घेऊनही प्रवाशांना तिकीट न दिल्याचे उघडकीस आले. या पाचही वाहकांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. प्रथमच पालिका अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे अचानक तपासणी मोहीम राबिवली. परिणामी दिवसभर बसमधील वाहकांनी प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट दिले. यामुळे नक्कीच उत्पन्नात भर पडेल, असा दावा परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे.

Five conductors of Apali bus in Nagpur suspended | नागपुरातील आपली बसचे पाच वाहक बडतर्फ

नागपुरातील आपली बसचे पाच वाहक बडतर्फ

Next
ठळक मुद्देमनपाची अचानक बस तपासणी मोहीम : सात बसमध्ये आढळले विनातिकीट प्रवासी 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात धावणाऱ्या २०६ बसची शुक्र वारी अकस्मात करण्यात आलेल्या तपासणीत महापालिका अधिकाऱ्यांना पाच बस वाहकांनी पैसे घेऊनही प्रवाशांना तिकीट न दिल्याचे उघडकीस आले. या पाचही वाहकांना तात्काळ बडतर्फ करण्यात आले. प्रथमच पालिका अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे अचानक तपासणी मोहीम राबिवली. परिणामी दिवसभर बसमधील वाहकांनी प्रवाशांकडून पैसे घेऊन तिकीट दिले. यामुळे नक्कीच उत्पन्नात भर पडेल, असा दावा परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे.
बस तपासी मोहिमेत महापालिकेतील प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, अनिरुद्ध चौगंजकर, राजेश भूतकर, एम. जी. कुकरेजा, मनोज गणवीर, राजेंद्र राहाटे, आर.एस. भुते, स्थावर अधिकारी अमिन अख्तर, प्रभारी कार्यकारी अभियंता अनिल नागदिवे, आसाराम बोदेले, अनिल कडू या अधिकाऱ्यांनी भाग घेतला. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान २०६ बसची अचानक तपासणी केली असता विनातिकीट प्रवासी आढळून आलेल्या सात वाहकांवर कारवाई करण्यात आली. तर पाच बसमधील वाहकांनी प्रवाशांचे पैसे घेतले; परंतु त्यांना तिकीट दिले नाही. दोघांनी तपासणीत सहकार्य केले नाही, असे कुकडे सांगितले.
परिवहन विभागाचा महसूल वाढविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. वर्धा रोड, हिंगणा रोड, छिंदवाडा रोड, मानेवाडा-बेसा रोड, नंदनवन-पारडी, सोनेगाव, जयताळा, नारा, नारी, इंदोरासह अनेक मार्गांवरील बसवर अचानक तपासणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तिकिटातील गैरप्रकाराला आळा बसला तर दररोज दीड लाख उत्पन्नाची भर पडेल, असा दावा कुकडे यांनी केला. यावेळी उपसभापती प्रवीण भिसीकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते.

Web Title: Five conductors of Apali bus in Nagpur suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.