नागपुरातील व्यापाऱ्याच्या घरातून पाच लाखाची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 09:32 PM2021-12-21T21:32:51+5:302021-12-21T21:33:23+5:30

Nagpur News लकडगंजमधील एका व्यापाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी पाच लाखाची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही चोरीची घटना घडली.

Five lakh cash robbed from a trader's house in Nagpur | नागपुरातील व्यापाऱ्याच्या घरातून पाच लाखाची रोकड लंपास

नागपुरातील व्यापाऱ्याच्या घरातून पाच लाखाची रोकड लंपास

googlenewsNext

नागपूर - लकडगंजमधील एका व्यापाऱ्याच्या घरातून चोरट्यांनी पाच लाखाची रोकड लंपास केली. सोमवारी सकाळी ही चोरीची घटना घडली.

आनंद अरुणकुमार रांदड (वय ३५) हे लकडगंजमधील क्वेटा कॉलनीत राहतात. चिखली कळमना भागात त्यांचे स्टील सेंटर आहे. त्यांनी व्यवसायाची पाच लाखाची रोकड घरात आणून ठेवली होती. सोमवारी सकाळी ९.४५ ते १०.३० च्या सुमारास त्यांनी रोकड असलेली बॅग आलमारीतून काढून सोफ्यावर ठेवली. त्यानंतर ते अंघोळीला निघून गेले. परत आले तेव्हा बॅग दिसून आली नाही. घरच्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनीही अनभिज्ञता दर्शविली. दार उघडे असल्याची संधी साधून चोरट्याने ही पाच लाखाची रोकड असलेली बॅग चोरून नेल्याचा अंदाज बांधून रांदड यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

----

Web Title: Five lakh cash robbed from a trader's house in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.