बनावट पावत्या देऊन पाच लाखांना गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 12:31 AM2021-07-31T00:31:27+5:302021-07-31T00:31:53+5:30
Fraud case स्टेट बँक ऑफ इंडियात रक्कम डिपॉझिट करायला लावून आरोपीने एकाजणाची ५ लाख सात हजारांनी फसवणूक केल्याची घटना १५ मे २०१४ ते ७ जानेवारी २०१९ दरम्यान बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टेट बँक ऑफ इंडियात रक्कम डिपॉझिट करायला लावून आरोपीने एकाजणाची ५ लाख सात हजारांनी फसवणूक केल्याची घटना १५ मे २०१४ ते ७ जानेवारी २०१९ दरम्यान बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विवेक वसंत बनकर (५६) रा. प्लॉट नं. ४५, नेहरूनगर, देवनगर असे आरोपीचे नाव आहे. त्याने विकास विजय वैद्य (वय ४६, रा. प्लॉट नं. १६, सावित्री विहार, सोमलवाड) यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डिपॉझिटबद्दल माहिती देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी नऊ लाख रुपये घेतले. आरोपीने वैद्य यांना एसबीआय बँकेचे स्टॅम्प आणि सही असलेल्या बनावट पावत्या दिल्या. तीन वर्षांनंतर आरोपीने वैद्य यांना व्याज म्हणून तीन लाख ९३ हजार रुपये दिले. त्यांनी बाकीची रक्कम मागितली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे वैद्य यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.