Nagpur | बिग बाजारजवळील एसबीआयचे एटीएम फोडून साडेपाच लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 03:28 PM2022-07-30T15:28:21+5:302022-07-30T15:56:24+5:30

नागपूरमधील वर्दळीच्या ठिकाणी ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Five lakh eighty two thousand looted by breaking SBI ATM in Nagpur | Nagpur | बिग बाजारजवळील एसबीआयचे एटीएम फोडून साडेपाच लाख लंपास

Nagpur | बिग बाजारजवळील एसबीआयचे एटीएम फोडून साडेपाच लाख लंपास

googlenewsNext

नागपूर : येथे रामदासपेठ परिसरातील बिग बजारजवळ असलेल्या एसबीआय एटीएममधून चोरट्यांनी ५ लाख ८२ हजार रुपये लंपास केल्याची घटना आज (दि. ३०) सकाळी उघडकीस आली आहे. कर्मचारी नेहमीप्रमाणे कामावर आले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याबाबत तत्काळ ब्रँचमध्ये माहिती दिली व पोलिसांना कळवण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन चौकशी सुरू केली आहे. महत्वाचे म्हणजे एटीएमची कोणतीही तोडफोड न करता साडेपाच लाखापेक्षा जास्त रक्कम लांबवण्यात आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. सध्या एटीएम व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच चोरीचा तपास लावल्या जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. 

सविस्त वृत्त थोड्याच वेळात..

Web Title: Five lakh eighty two thousand looted by breaking SBI ATM in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.