नागपूर महामेट्रो प्रकल्पाच्या फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 12:24 AM2019-07-05T00:24:17+5:302019-07-05T00:25:01+5:30
महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती मिळाली असून हा पल्ला केवळ चार वर्षांत गाठला आहे. देशाच्या इतर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत हा प्रकल्प अग्रेसर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रो नागपूर प्रकल्पाच्या फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती मिळाली असून हा पल्ला केवळ चार वर्षांत गाठला आहे. देशाच्या इतर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत हा प्रकल्प अग्रेसर आहे.
वर्धा मार्गावर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू असून हिंगणा मार्गावरही लवकरच सुरू होणार आहे. मेट्रोच्या बांधकामाची अद्ययावत माहिती तपासणे, प्रवासी वाहतूक सेवेची माहिती मिळविणे, शंकांचे निरसन करून घेणे हा दैनंदिन कार्याचा भाग आहे. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मिळत मेट्रोच्या फेसबुक पानाला ५ लाख लाईक्स मिळाले असून पहिल्या क्रमांकाचे फेसबुक पान ठरले आहे. नागरिकांच्या फायद्याची माहिती ‘फेसबुक लाईव्ह’ स्वरूपात व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रृजेश दीक्षित यांच्यातर्फे व्हिडिओ स्वरुपात पोहोचविली जाते.
भारतीय परंपरेत गणेशोत्सव, पहिल्यांदाच मेट्रोचे डबे नागपुरात पोहचल्याची पोचपावती, नागपूर मेट्रोचा उद्घाटन सोहळा व नागपूर मेट्रो पहिल्यांदाच वर्धा मार्गावर धावणारा प्रसंग, असे आनंदाचे प्रसंग फेसबुक लाईव्ह करण्यात आले. याशिवाय प्रवासी मेट्रो सेवा, बांधकाम स्थळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या कॅमेऱ्याने टिपलेले छायाचित्र प्रकाशित करणे किंवा विविध स्पर्धेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना जुळवून ठेवण्याचे काम हे फेसबुक पेज करीत आहे. त्या आधारे महामेट्रोच्या पारदर्शक कामाची प्रचिती नागरिकांना येते. त्यामुळेच मेट्रो चमूसोबत सामाजिक कार्य करण्याची नागरिकांची रुची वाढत आहे. या माध्यमातून ५ लाखाांपेक्षा जास्त मेट्रोमित्र तयार झाले आहेत.
नागपूर फेसबुक पेजला पाच लाख नागरिकांची पसंती मिळाल्याचा उत्सव ४ जुलैला मेट्रो मित्रांसोबत डॉ. दीक्षित आणि चमूने साजरा केला. दीक्षित यांनी यशाचे श्रेय नागपूरकरांना दिले. यावेळी संचालक (वित्त) एस. शिवमाथन, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.