शहरातील प्रमुख पाच तलावांची स्थिती अत्यंत वाईट ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:14+5:302021-03-25T04:08:14+5:30

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने २०१९-२० चा शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल महापालिकेला सादर केला आहे. यात अभ्यासलेली ...

Five major lakes in the city are in critical condition | शहरातील प्रमुख पाच तलावांची स्थिती अत्यंत वाईट ()

शहरातील प्रमुख पाच तलावांची स्थिती अत्यंत वाईट ()

Next

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने २०१९-२० चा शहराचा पर्यावरण स्थिती अहवाल महापालिकेला सादर केला आहे. यात अभ्यासलेली तलावांची स्थिती चिंताजनक आहे. सर्व तलावांचे सर्व प्रकारचे प्रदूषण वाढीस लागले आहे. गढूळपणा, आम्लपणा, पाण्याची कठीणता, सल्फेट, नायट्रेट, फॉस्फेट, धातू-अधातूंचे प्रमाण, सीओडी, बीओडी आणि कॉलिफॉर्म आदी सर्व प्रकारच्या घटकांची तलावांच्या पाण्यात वाढ झाली आहे. घराघरातील सिवेज, गटार आणि फेकला जाणारा कचरा हे या प्रदूषणाचे प्रमुख कारण आहेत.

- नीरीच्या टीमने प्रत्येक तलावातून वरच्या स्तराची व खोलातील नमुन्यांची सखोल तपासणी करून हा अहवाल तयार केला आहे.

अभ्यासातील महत्त्वपूर्ण बाबी

- सर्व तलावांचे पीएच लेव्हल ६.९ ते ८.५ च्या दरम्यान आहे.

- गढूळपणा ५ ते १०० एनटीयूपर्यंत म्हणजे सामान्यपेक्षा कितीतरी अधिक.

- सल्फेट/नायट्रेट ३६ ते १८६ व ३ ते ४० मिग्रॅ/लिटरच्या रेंजमध्ये.

- सीओडी २५ ते १४० मिग्रॅ/लिटर तर बीओडी ४.६ ते ८० मिग्रॅ/लिटर.

- फुटाळ्यात सीओडी १६ ते ४० मिग्रॅ/लि. व बीओडी ६-२० मिग्रॅ/लि.

- फुटाळ्याचा आम्लपणा २२० ते ३४८ मिग्रॅ/लिटर, गढूळपणा १० एनटीयू. सल्फेट/नायट्रेट ६५ ते ८८ मिग्रॅ/लिटर.

तलावांनुसार स्थिती

- अंबाझरी तलावात मासे व जैवविविधतेचे समाधानकारक अस्तित्व.

- नाईक तलावात विरघळलेल्या घनपदार्थांचे प्रमाण २००० मिग्रॅ/ली.च्यावर

- सर्व तलावांत कॉलिफॉर्मचे प्रमाण अधिक. कॉलिफॉर्म मानवी शरीरातील घटक असून त्याच्या असण्याने सिवेज वाहत असल्याचे लक्षात येते.

- नाईक तलावात कॉलिफॉर्म ४८० ते ४९० मिग्रॅ/लि. अत्याधिक धोक्यात.

- सोनेगाव, गांधीसागर, अंबाझरीमध्ये सीओडी व बीओडी अधिक.

- सक्करदरा, गांधीसागरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फ्लोराईड, क्लोराईड आदी पोषण घटकांचे प्रमाण अत्याधिक.

- सर्व तलावांमध्ये मेटल्सचे प्रमाणही वाढत आहे.

Web Title: Five major lakes in the city are in critical condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.