पाच मिनिटे लेट झाली, विद्यार्थिनी ‘नीट’लाच मुकली; हुंदके आवरेना : विनंती करूनही दिला नाही प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 07:08 AM2024-05-06T07:08:31+5:302024-05-06T07:08:45+5:30

शेवटी परीक्षेला मुकलीच आणि वर्षभर ज्यासाठी परिश्रम घेतले, तेच गमावल्याने तिचा हुंदका दाटून आला. 

Five minutes late, the student missed the 'neet'; cry : Entry not granted despite request | पाच मिनिटे लेट झाली, विद्यार्थिनी ‘नीट’लाच मुकली; हुंदके आवरेना : विनंती करूनही दिला नाही प्रवेश

पाच मिनिटे लेट झाली, विद्यार्थिनी ‘नीट’लाच मुकली; हुंदके आवरेना : विनंती करूनही दिला नाही प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘नीट’चे परीक्षा केंद्र गाठण्यासाठी काटाेलहून धावपळीचा प्रवास करताना ऐनवेळी गाडीने दगा दिला. ती ऑटाे पकडून कशीबशी धापा टाकत परीक्षा केंद्रापर्यंत पाेहोचली पण तेव्हा दुपारची १:३५ मिनिटे झाली. म्हणजे निर्धारित वेळेपेक्षा तिला ५ मिनिटे उशीर झाला. ती केंद्र चालकांना विनंती करू लागली, अक्षरश: रडू लागली पण त्यांना पाझर फुटला नाही. ती शेवटी परीक्षेला मुकलीच आणि वर्षभर ज्यासाठी परिश्रम घेतले, तेच गमावल्याने तिचा हुंदका दाटून आला. 

गाडी पंक्चर झाली... ऑटाेने केंद्राकडे निघाली  
रविवारी नीटची परीक्षा हाेती. काटाेल येथे राहणाऱ्या भाविकाने यासाठी वर्षभर तयारी केली हाेती. सकाळी ती बहिणीसाेबत गाडीने नागपूरच्या केंद्राकडे निघाली. मात्र तिची गाडी पंक्चर झाली. तिथे वेळ घालविण्यापेक्षा ती ऑटाेने केंद्राकडे निघाली. मात्र वेळेत पाेहोचायला तिला यश आले नाही. तिने शिक्षकांना, केंद्र चालकांना काकुळतीला येऊन प्रवेशाची विनंती केली, पण ते मानायला तयार झाले नाही.

उड्डाणपुलावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
बुटीबोरी (जि. नागपूर) : नीट परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थिनीचा बुटीबाेरी शहरातील उड्डाणपुलावरून काेसळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री १:३० ते २ वाजेच्या दरम्यान घडली. तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.नीलिमा अखिलेश साहू (वय १९) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. शनिवारी रात्री मध्यरात्री उड्डाणपुलाच्या खाली अनाेळखी तरुणी जखमी अवस्थेत आढळली. तिला हाॅस्पिटलमध्ये नेले. मात्र, तिला मृत घाेषित केले. 

Web Title: Five minutes late, the student missed the 'neet'; cry : Entry not granted despite request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.