पाच खून करणारा  क्रूरकर्मा पालटकर मोकाटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:37 PM2018-06-14T23:37:22+5:302018-06-14T23:39:09+5:30

राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ३५) याचा अद्याप शोध लागलेला नाही. या हत्याकांडाला आज चार दिवस पूर्ण झाले आहे.

The five murderers have revolutionized the revolutionaries | पाच खून करणारा  क्रूरकर्मा पालटकर मोकाटच

पाच खून करणारा  क्रूरकर्मा पालटकर मोकाटच

googlenewsNext
ठळक मुद्देचार दिवस होऊनही हाती लागला नाही : पोलिसांची शोधाशोध सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या नंदनवनमधील पवनकर कुटुंबीयांच्या हत्याकांडातील क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (वय ३५) याचा अद्याप शोध लागलेला नाही. या हत्याकांडाला आज चार दिवस पूर्ण झाले आहे.
नंदनवनमधील आराधनानगरात राहणारे भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना, मुलगी वेदांती आणि आई मीराबाई तसेच कमलाकर यांचा चार वर्षाचा भाचा कृष्णा पालटकर या पाच जणांची लोखंडी बत्त्याने ठेचून नराधम विवेक गुलाब पालटकर याने निर्घृण हत्या केली होती. हे थरारक हत्याकांड उघडकीस आल्यापासून पालटकर फरार आहे. नंदनवन पोलीस, गुन्हे शाखा तसेच वेगवेगळी शोधपथके या नराधमाचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत. मात्र, चार दिवस होऊनही त्याच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे नागपूरकरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मोकाट फिरणारा क्रूरकर्मा कुठे दडून बसला आहे, हा प्रश्न सर्वत्र चर्चेला आला असून, तो आणखी कुणाचा गेम तर करणार नाही ना, अशी भीतीवजा शंकाही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हे थरारक हत्याकांड घडवून आणणारा आरोपी हाती लागत नसल्याने पोलिसांवरही दडपण आले आहे. आज आणखी काही पोलीस पथकं आरोपीचा शोध घेण्यासाठी कामी लावण्यात आले आहे.
तो सायकोच !
दरम्यान, पोलिसांनी त्याचा छडा लावण्यासाठी मध्यवर्ती कारागृहातील त्याच्या संपर्कात असलेल्या काही गुन्हेगारांना विचारपूस केली. तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडेही चौकशी केली असता नराधम पालटकर हा सायकोच असल्याचे पुढे आले. त्याच्यावर कारागृहात असताना तसे उपचारही होत होते, अशीही माहिती पुढे आली आहे.

अफवांचे पेव, पोलिसांची धावाधाव!
नराधम पालटकरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याचे छायाचित्र जारी केले. त्याच्यावर पुरस्कारही जाहीर केला. त्या अनुषंगाने पोलिसांना पालटकर सारखे वर्णन असलेल्या अनेकांबाबत फोन येत आहे. गुरुवारी दुपारी नंदनवन पोलिसांना नराधम पालटकर उमरेडमध्ये असल्याची माहिती एकाने फोन करून दिली. पोलिसांचे पथक तातडीने उमरेडकडे रवाना झाले. मात्र, फोन करणाऱ्याने दिलेल्या वर्णनाची व्यक्ती पालटकर नसल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: The five murderers have revolutionized the revolutionaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.