नागपुरात बेरोजगारासह पाच लोकांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 01:32 AM2020-08-27T01:32:50+5:302020-08-27T01:34:07+5:30
कोरोना संक्रमणामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेरोजगार मजुरासह पाच लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे आर्थिक संकटात असलेल्या बेरोजगार मजुरासह पाच लोकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. इंद्रायणीनगर येथील ३० वर्षीय सायमन जॉर्ज थॉमस हा पेंटिंगचे काम करीत होता. कोरोनामुळे रोजगार मिळत नसल्याने तो आर्थिक संकटात सापडला होता. त्यामुळे मानसिक संतुलनसुद्धा खराब झाले होते. त्याने मंगळवारी दुपारी फाशी घेतली. त्याचबरोबर पंचवटीनगर, यशोधरानगर येथील ४२ वर्षीय संतोष काटेकर हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कोरोनामुळे त्याच्या हाताला सुद्धा काम नव्हते. त्यानेही सोमवारी फाशी घेऊन आत्महत्या केली. अंगुलीमाल नगर, कपिलनगर येथील २८ वर्षीय हर्षल वसंता पाटील यानेसुद्धा फाशी घेऊन आत्महत्या केली. कॅटरींगचे काम करणारा हर्षल काही दिवसांपासून बेरोजगार होता. त्यामुळे तो तणावात राहत होता. पवनशक्तीनगर, वाठोड़ा येथील ३३ वर्षीय अमोल खंडाळ याने फाशी घेतली. इलेक्ट्रीकचे काम करणारा अमोलची काही दिवसांपासून प्रकृती अत्यवस्थ होती. त्याचबरोबर टिमकी, तीनखंबा चौक येथील ५५ वर्षीय राम मोतीलाल पुरे यांनी फाशी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.