पाच कीटकनाशकावर बंदी, पण आदेश निघणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 10:51 PM2019-09-18T22:51:07+5:302019-09-18T22:52:42+5:30

कृषिमंत्र्यांनी पाच कीटकनाशकावर बंदी घालण्याचा आदेश काढला. आठवड्याभरापूर्वी त्यावर सहीही केली. पण अजूनही आदेश निघाला नाही.

Five pesticides banned, but when will the order come out? | पाच कीटकनाशकावर बंदी, पण आदेश निघणार कधी?

पाच कीटकनाशकावर बंदी, पण आदेश निघणार कधी?

Next
ठळक मुद्देकृषिमंत्र्यांच्या सहीनंतरही सात दिवसांचा कालावधी लोटला : विदर्भात विषबाधेमुळे तीन शेतकऱ्यांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अधिकारी मंत्र्यांचेही ऐकत नसल्याची बाब बुधवारी कृषिमंत्र्याच्या पत्रपरिषदेत अनुभवास आली. कृषिमंत्र्यांनी पाच कीटकनाशकावर बंदी घालण्याचा आदेश काढला. आठवड्याभरापूर्वी त्यावर सहीही केली. पण अजूनही आदेश निघाला नाही. ही बाब जेव्हा कृषिमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली, तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ फोन करून बंदीचा आदेश काढण्याच्या सूचना केल्या. कीटकनाशकाच्या फवारणीमुळे विदर्भातील काही जिल्ह्यात शेतकऱ्यांना विषबाधा झाल्या आहे. तीन शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. याकडे गंभीरतेने घेऊन कृषिमंत्र्यांनी पाच कीटकनाशकावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. पण त्याची अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी केली नसल्याचे दिसून आले.
गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही कीटकनाशकाच्या फवारणीमुळे यवतमाळ, अकोला जिल्ह्यात विषबाधा झाल्या आहेत. कृषिमंत्र्यांनी परिसरात दौरा केला असता, एका शेतकऱ्याचा मृत्यूही विषबाधेमुळे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कीटकनाशकावर बंदी आणण्याचा निर्णय घेतल्याचे, कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पत्रपरिषेद सांगितले. भारतरत्न नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची व्याप्ती वाढविण्यात आल्याची माहिती देण्यासाठी त्यांनी पत्रपरिषद आयोजित केली होती. पत्रपरिषदेला जिल्हा कृषी अधीक्षक मिलिंद शेंडे उपस्थित होते. कृषी संजीवनी योजनेची माहिती देताना बोंडे म्हणाले की, विदर्भ आणि मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. जवळपास पाच हजार गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. तीन हजार कोटीची त्यासाठी तरतूद केली आहे. योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांबरोबरच आता दोन हेक्टरपेक्षा अधिक जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. शिवाय अनुदानाची टक्केवारी ५० वरून ७५ टक्के केली आहे. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाच हजार कृषिमित्र व कृषिताईची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे आर्ट ऑफ लिव्हींग संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणही झाले आहे. कृषिमित्राच्या माध्यमातून वातावरणातील बदल, त्याचे होणारे पिकावर परिणाम, पीक पद्धतीमध्ये बदल, कमी पाण्यात कोणते पीक घेता येतील, बहुविध पीक पद्धती, जमिनीचा पोत सुधारणे, पाण्याचा काटकसरीने वापर, शेतावर खताची निर्मिती करणे, बियाण्याचे उत्पादन, मार्केटिंग यासंदर्भात शेतकरीशेतकरी गटांमध्ये समन्वय साधण्याचे काम करणार आहे. प्रत्येक शेतकऱ्यांशी समन्वय साधण्यात येणार असल्याने शेतकरी आत्महत्याही कमी होणार असल्याचे बोंडे म्हणाले.
एचटीबीटीचा अहवाल गृहखात्यात अडकला
मान्यता नसतानाही एचटीबीटीची विक्री छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात झाली आहे. यासंदर्भात कृष्णप्रकाश यांच्या अध्यक्षतेत एसआयटीचे गठण झाले होते. त्यांनी या प्रकरणी चौकशी करून अहवाल द्यावे, असे गृहखात्याला लिहिलेही होते. परंतु कृष्णप्रकाश यांची बदली झाली. हा विषय गृहखात्याशी निगडित आहे. त्यामुळे गृहखात्याला विनंती केली आहे. ताबडतोब अधिकारी नेमून अहवाल द्या, असे कृषिमंत्री बोंडे म्हणाले.

 

Web Title: Five pesticides banned, but when will the order come out?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.