पाच संचाद्वारे अखंड वीजनिर्मितीची कामगिरी

By admin | Published: March 30, 2015 02:31 AM2015-03-30T02:31:10+5:302015-03-30T02:31:10+5:30

महाजेनकोच्या खापरखेडा येथील वीज केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे चार आणि ५०० मेगावॅट क्षमतेचा एक असे एकूण १३४० मेगावॅट क्षमतेचे पाच संच १० सप्टेंबर २०१४ पासून अविरत वीजनिर्मिती करीत आहेत.

Five sets of intensive power generation | पाच संचाद्वारे अखंड वीजनिर्मितीची कामगिरी

पाच संचाद्वारे अखंड वीजनिर्मितीची कामगिरी

Next

खापरखेडा : महाजेनकोच्या खापरखेडा येथील वीज केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे चार आणि ५०० मेगावॅट क्षमतेचा एक असे एकूण १३४० मेगावॅट क्षमतेचे पाच संच १० सप्टेंबर २०१४ पासून अविरत वीजनिर्मिती करीत आहेत. यातील २१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक १ ने अखंड वीजनिर्मितीचा २०० दिवसांचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला. हा अखंड वीजनिर्मितीचा विक्रम आहे.
२१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक-१ ची ही कामगिरी महानिर्मितीच्या अलिकडच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी मानली जाते. यापूर्वी यास वीजनिर्मिती संचाने १२ एप्रिल २००६ ते १२ आॅक्टोबर २००६ या काळात १८२.९७ दिवस अखंड वीजनिर्मितीचा विक्रम नोंदविला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हा संच २६ मार्च १९८९ रोजी कार्यान्वयित करण्यात आला असून, त्या संचाला २६ मार्च २०१४ रोजी २६ वर्षे पूर्ण झाली आहेत.
२१० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक १ ते ४ या चार संचांनी एकत्रित ३० आॅक्टोबर २०१४ ते ९ जानेवारी २०१५ या काळात ७०.९७ दिवस अखंड वीजनिर्मिती करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम ५०.४५ दिवसांचा होता. तो ९ मे २००७ ते २९ जून २००७ या काळात नोंदविण्यात आला होता. या वीजकेंद्राच्या इतिहासात पहिल्यांदाच संच क्रमांक १ ते ४ या संचांनी सलग नोव्हेंबर व डिसेंबर २०१४ या दोन महिन्यात १०० टक्के उपलब्धता गाठली आहे.
डिसेंबर २०१४ मध्ये ०.१६५ मि.लि. प्रति युनिट इतके कमी तेल वापरून नवीन विक्रम प्रस्थापित केला होता. यासाठी उपमुख्य अभियंता बाबुराव बागडे यांच्या नेतृत्वातील कर्मचाऱ्यांची फळी सतत वीज निर्मिती संचालन प्रक्रियेत सुधारणा करून संच बंद न होण्याचे प्रमाण कमी करीत आहेत.
या केंद्रातील ५०० मेगावॅट क्षमतेचा पाचवा संच व्यावसायिकदृष्ट्या १६ एप्रिल २०१२ रोजी कार्यान्वयित करण्यात आला. या संचाने फेब्रुवारी २०१५ मध्ये ३२१.१९७ दशलक्ष युनिट वीज निर्मिती केली. ही या संचाची सर्वोत्तम कामगिरी मानली जाते.
या संचाने २४ मार्च २०१५ रोजी १२.२३४ दशलक्ष वीज निर्मिती करून विक्रम प्रस्थापित केला. उपमुख्य अभियंता गिरीश कुमरवार व त्यांचे सहकारी या संचाचे संचालन करतात. या यशस्वी वाटचालीसाठी मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांच्या नेतृत्वात राजेश राजगडकर, हेमंत रंगारी, शांताराम पौनीकर, सिद्धार्थ तितरे, हिंमत अवचार, दीपक जोशी आदी अभियंत्यांसह सर्व अधिकारी, कामगार, कंत्राटी कामगार व कंत्राटदार प्रयत्नरत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Five sets of intensive power generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.