रस्त्यांवरील पाच ट्रक माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:31 AM2017-11-03T01:31:44+5:302017-11-03T01:32:07+5:30
तुकडोजी चौक ते मानेवाडा रिंगरोडवर फळविक्रेत्यांपासून ते भाजी विक्रेते, चहा टपºया, दुकानदार, हॉटेल्स,औषध विक्रेते, फर्निचर व्यावसायिक व किराणा व्यापाºयांनी अतिक्रमण केल्याने या मार्गाने वाहन चालविणे कठीण झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुकडोजी चौक ते मानेवाडा रिंगरोडवर फळविक्रेत्यांपासून ते भाजी विक्रेते, चहा टपºया, दुकानदार, हॉटेल्स,औषध विक्रेते, फर्निचर व्यावसायिक व किराणा व्यापाºयांनी अतिक्रमण केल्याने या मार्गाने वाहन चालविणे कठीण झाले होते. ‘लोकमत’ने या विषयी वृत्त प्रसिद्ध करताच बुधवारी वाहतूक चेंबर चार अजनी पोलिसांनी व महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने विशेष कारवाई करीत तब्बल पाच ट्रक माल जप्त केला. सोबतच २८ हजार रुपयांची वसुलीही केली. या कारवाईने अतिक्रमण करणाºयांचे धाबे दणाणले आहे.
राष्टÑसंत तुकडोजी महाराज चौक ालगत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची गर्दी या भागात असते. तुकडोजी चौकातून मानेवाडा रिंगरोड व हुडकेश्वर रिंगरोडला जाणाºया मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. मात्र फूटपाथच नव्हे तर त्याहीपुढेही अतिक्रमण झाले होते. या शिवाय, बीअरबार, बँक, किराणा दुकान व हॉटेल्समध्ये येणारे ग्राहक रस्त्यावरच आपली वाहने उभी करीत असल्याने आणि विविध खाद्य पदार्थांचे व फळांचे हातठेले फुटपाथसह रस्त्यावर उभे केले जात असल्याने वाहतुकीची नेहमीच कोंडी व्हायची. ‘लोकमत’ने २९ आॅक्टोबर रोजी ‘मानेवाडा रोडचा श्वास गुदमरतोय’ या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल वाहतूक चेंबर चार अजनीचे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के यांनी घेतली. त्यांनी लागलीच मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या मदतीने बुधवारी धडक कारवाई केली. दुपारी १२ वाजता सुरू झालेली ही कारवाई सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालली. यात पाच ट्रक अतिक्रमण साहित्य जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, २८ हजार रुपयांची वसुलीही करण्यात आली. पहिल्यांदा एवढ्या मोठ्या स्वरुपात झालेल्या कारवाईमुळे कधी नव्हे तो हा मार्ग अतिक्रमण मुक्त झाला. नागरिकांनी ‘लोकमत’सोबतच अजनी वाहतूक पोलीस विभागाचे कौतुक केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के व मनपाचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व पोलीस सहनिरीक्षक विलास सानप यांनी केली.
कारवाई सुरूच राहणार
तुकडोजी चौक ते मानेवाडा रोड या मार्गावर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. परंतु पुन्हा या मार्गावर अतिक्रमण झाल्यास अतिक्रमणधारकावर कठोर कारवाई करण्यात येईल. इतरही मार्गावर निरंतर कारवाई सुरू राहील.
- श्याम सोनटक्के
पोलीस निरीक्षक,
वाहतूक चेंबर चार अजनी