बालरंगभूमी परिषदेची पंचवार्षिक कार्यकारिणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:07 AM2021-04-06T04:07:16+5:302021-04-06T04:07:16+5:30
- आभा मेघे अध्यक्ष तर रोशन नंदवंशी प्रमुख कार्यवाह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेच्या स्थायी ...
- आभा मेघे अध्यक्ष तर रोशन नंदवंशी प्रमुख कार्यवाह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेच्या स्थायी पंचवार्षिक कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी आभा मेघे तर प्रमुख कार्यवाह म्हणून रोशन नंदवंशी यांची नियुक्ती करण्यात आली.
नागपूर शाखेची स्थापना झाल्यानंतर २०१९ ते २०२१ या कालावधीसाठी अस्थायी स्वरूपाची समिती नेमण्यात आली होती. या समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर घटनेनुसार निवडणूक अधिकारी किशोर डाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली २०२१-२६ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. कार्यकारिणीच्या कार्याध्यक्षपदी संयज रहाटे, उपाध्यक्ष (प्रशासन) राजेश चिटणीस, उपाध्यक्ष (उपक्रम) रूपाली मोरे, कोषाध्यक्ष विलास कुबडे, सहकार्यवाह वैदेही चवरे-सोईतकर, निलेश खांडेकर, अमोल निंबार्ते यांची तर कार्यकारी सदस्य म्हणून प्रशांत मंग्दे, योगेश राऊत, नितीन पात्रीकर, रोहित घांगरेकर, किशोर बत्तासे, अरिहंत भुसारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी पार पडलेली सभा अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी उपस्थित होते.
................