दिग्रसचे पाच तरुण कन्हान नदीत बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:12 AM2021-09-06T04:12:35+5:302021-09-06T04:12:35+5:30

धनंजय कापसीकर लाेकमत न्यूज नेटवर्क कन्हान : अम्मा का दर्गालगतच्या कन्हान नदीच्या पात्रात पाेहण्यासाठी उतरलेले दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथील ...

Five young men from Digras drowned in the Kanhan River | दिग्रसचे पाच तरुण कन्हान नदीत बुडाले

दिग्रसचे पाच तरुण कन्हान नदीत बुडाले

Next

धनंजय कापसीकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

कन्हान : अम्मा का दर्गालगतच्या कन्हान नदीच्या पात्रात पाेहण्यासाठी उतरलेले दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथील पाच तरुण प्रवाहात आले आणि गटांगळ्यात खात बुडाले. ही घटना कन्हान शहराजवळील जुनी कामठी (ता. पारशिवनी) येथे रविवारी (दि. ५) सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. यातील एकाचा मृतदेह दुपारी २.३० वाजताच्या सुमारास शाेधून काढण्यात बचाव पथकाला यश आले. अन्य चाैघांचे शाेधकार्य सायंकाळपर्यंत सुरू हाेते.

बुडालेल्या तरुणांमध्ये सय्यद अरबाज ऊर्फ लकी (२२), अय्याज बेग हाफीज बेग (२०), शेख अबुजर शेख अलताफ बेग (१८), शेख सबतैयन शेख इकबाल (२१) व ख्वाजा बेग कालू बेग (१७) (सर्व रा. दिग्रस, जिल्हा यवतमाळ) यांच्या समावेश असून, यातील ख्वाजा बेग कालू बेग याचा मृतदेह शाेधण्यात यश आले आहे.

हे पाच जण त्यांच्या मित्रांसह एमएच-२९/एआर-५३४२ क्रमांकाच्या क्रुझरने शनिवारी (दि. ४) मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास दिग्रसहून नागपूरला यायला निघाले. त्यांनी रविवारी पहाटे नागपूर शहरातील माेठा ताजबाग येथे दर्शन घेतले आणि सकाळी ८ वाजताच्या सुमारास याच वाहनाने जुनी कामठी येथील अम्मा का दर्गा येथे दर्शनासाठी आले. हे पाचही जण अंघाेळ करण्यासाठी पात्रात उतरले तर इतर वाहनात आराम करीत बसले. यातील चाैघांनी पाेहायला सुरुवात केली. ते प्रवाहात आल्याने गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे अरबाज त्यांना वाचविण्यासाठी पुढे सरसावला व ताेही गटांगळ्या खाऊ लागला.

हा प्रकार लक्षात येताच प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरड करायला सुरुवात केली तर काहींनी लगेच पुरुषाेत्तम कावळे यांच्या जीवन रक्षक पथकाला सूचना दिली. ताेपर्यंत पाचही जण प्रवाहात आल्याने वाहून गेले. पुरुषाेत्तम कावळे यांच्या सहकाऱ्यांनी लगेच घटनास्थळ गाठून शाेधकार्य सुरू केले. अप्पर पाेलीस अधीक्षक राहुल माखनीकर, तहसीलदार प्रशांत सांगोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागबान, ठाणेदार विलास काळे यांनी घटनास्थळ गाठले. अंधारामुळे शाेधकार्य थांबविण्यात आले हाेते. साेमवारी सकाळीपासून शाेधकार्याला पुन्हा सुरुवात केली जाईल, अशी माहिती उपविभागीय पाेलीस अधिकारी मुख्तार बागबान यांनी दिली.

...

दूरवर वाहून गेल्याचा अंदाज

अम्मा का दर्गा परिसरात कन्हान नदीचे पात्र खाेल व थाेडे विस्तीर्ण आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह थाेडा अधिक आहे. पाचही जण प्रवाहात आल्याने वाहून गेले. यातील एकाचा मृतदेह घटनास्थळापासून २५० मीटर अंतरावर आढळून आला. एसडीआरएफचे पथक व पुरुषाेत्तम कावळे यांच्या सहकाऱ्यांनी नदीचा अर्धा ते पाऊण किमी किनारा हुडकून काढला. ते बाबदेव (ता. माैदा)पर्यंत वाहून गेल्याचा अंदाज बचाव पथकातील सदस्यांनी व्यक्त केला.

...

धाेकादायक ठिकाण

कन्हान नदीच्या काठावर अम्मा का दर्गा असून, येथे दर्शनाला येणारे भाविक आधी नदीत अंघाेळ करतात. दर्गा कमिटीने नदीत उतरण्यासाठी पायऱ्या तयार केल्या हाेत्या. या ठिकाणी त्यांनी सूचना फलक लावून कुणीही नदीच्या खाेल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन केले हाेते. परंतु, कुणीही त्या सूचना फलकाकडे लक्ष देत नाही. मागील वर्षीच्या पुरामुळे पायऱ्यांसह फलक वाहून गेला. शिवाय, पात्रात खाेल खड्डेही तयार झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी येथील प्रवाह तेज असल्याची माहिती पुरुषाेत्तम कावळे यांनी दिली. गेल्या ४० वर्षांत या ठिकाणी १०० जणांचा बुडून मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Five young men from Digras drowned in the Kanhan River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.