वीज बिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 01:10 AM2020-04-13T01:10:15+5:302020-04-13T01:11:02+5:30

नितीन राऊत : औद्योगिक व वाणिज्य वापराबाबत निर्णय

Fixed charge of electricity bill postponed for three months | वीज बिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित

वीज बिलातील स्थिर आकार तीन महिन्यांसाठी स्थगित

Next

नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्यात २२ मार्च ते ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. परिणामी राज्यातील बहुतेक सर्वच मोठे उद्योग आणि वाणिज्यिक ग्राहकांनी आपला व्यवसाय बंद केलेला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीत बंद असलेल्या औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार पुढील ३ महिन्यांसाठी स्थगित करण्यात येत असून त्यानंतर येणाऱ्या बिलात कोणताही दंड न आकारता तो समाविष्ट करण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी रविवारी नागपूर येथे दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीतील वीजबिलातील स्थिर आकार/मागणी आकार माफ करण्यात यावा, अशी मागणी अनेक औद्योगिक तसेच वाणिज्यिक ग्राहकांनी केली होती, ही मागणी ग्राह्य धरून राऊत यांनी या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. एएमआरमार्फत ज्या ग्राहकांचे मीटर वाचन उपलब्ध असल्यास अशा ग्राहकांना त्यांच्या मीटरवरील नोंदीनुसार वास्तविक बील देण्यात येईल. जर ग्राहकांचे मीटर रीडिंग उपलब्ध नसल्यास त्या ग्राहकांना सरासरी वीजबिल आकारण्यात येईल. मे २०२० मध्ये एएमआरमार्फत बिलाची माहिती उपलब्ध झाल्यानंतर वास्तविक मीटर रीडिंगनुसार वीजबिल आकारण्यात येईल. राऊत म्हणाले की, अशा ग्राहकांचे मीटर रीडिंग मिळाल्यानंतर त्यांना या कालावधीत नोंदविलेल्या वास्तविक वापराचे वीजबिल देण्यात येईल.

दोन्ही बिलांवर अनुदान लागू
मार्च-२०२० महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक १५ मे असणार आहे तर एप्रिल-२०२० महिन्याच्या वीजवापराच्या बिलाचे देयक दिनांक ३१ मे-२०२० राहील. या दोन्ही महिन्यांच्या बिलावर नियमाप्रमाणे अनुदान लागू असेल.

Web Title: Fixed charge of electricity bill postponed for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.