१ मे रोजी फक्त आयुक्तालयात ध्वजारोहण; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 09:00 AM2021-04-30T09:00:00+5:302021-04-30T09:00:01+5:30

Nagpur News May 1 १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. मर्यादित उपस्थितीत सकाळी ८ वाजता ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.

Flag hoisting at the Commissionerate only on May 1; The corona will be celebrated simply in the background | १ मे रोजी फक्त आयुक्तालयात ध्वजारोहण; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा होणार

१ मे रोजी फक्त आयुक्तालयात ध्वजारोहण; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा होणार

Next
ठळक मुद्देकवायती,संचलन होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर :  १ मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात आयोजित करण्यात येणार आहे. मर्यादित उपस्थितीत सकाळी ८ वाजता ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतुदी विचारात घेऊन राज्यात यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१ वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात यावा, अशा सूचना राजशिष्टाचार शाखेमार्फत देण्यात आल्या आहेत.

राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहेत. या तरतुदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन समारंभ गतवर्षीप्रमाणेच अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याच्या दृष्टीने विविध निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात केवळ एकाच ठिकाणी सकाळी ८ वाजता फक्त ध्वजारोहण करण्यात यावे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती यांनी ध्वजारोहण समारंभाकरिता योग्य ती व्यवस्था करावी. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाचा वेगळा कार्यक्रम आयोजित करू नये. इतर सर्व जिल्ह्यात केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या ठिकाणी केवळ पालकमंत्री, विभागीय आयुक्त मुख्यालयी समारंभ असल्यास विभागीय आयुक्त, महापौर/नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, ज्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एवढ्याच पदाधिकारी/अधिकारी यांनी उपस्थित राहावे. इतर मान्यवरांना आमंत्रित करण्यात येऊ नये. तसेच कवायती/संचलन आयोजन करण्यात येऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विधिमंडळ, उच्च न्यायालय व इतर संविधानिक कार्यालयांमध्ये कमीतकमी उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात यावे.

ध्वजारोहण करणारे पालकमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास, विभागीय आयुक्त मुख्यालयी विभागीय आयुक्तांनी व जिल्हा मुख्यालयी जिल्हाधिकारी यांनी ध्वजारोहण करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Flag hoisting at the Commissionerate only on May 1; The corona will be celebrated simply in the background

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.