फ्लार्इंग क्लबची उड्डाणे बंद
By admin | Published: April 4, 2015 02:21 AM2015-04-04T02:21:08+5:302015-04-04T02:21:08+5:30
पूर्ण वेळ प्रशिक्षक नसल्याचे कारण पुढे करून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नागपूरच्या फ्लार्इंग
परवानगी नाकारली : प्रशिक्षणार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूर
पूर्ण वेळ प्रशिक्षक नसल्याचे कारण पुढे करून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नागपूरच्या फ्लार्इंग क्लबची विमान उड्डाणाची परवानगी रद्द केल्याने तेथील ३० प्रशिक्षणार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
एकीकडे नागपूरचा विकास झपाट्याने होत आहे. मिहानमध्ये मोठी गुंतवणूक येत असल्याचे दावे केले जात असले तरीही प्रत्यक्षात मात्र फ्लार्इंग क्लबला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयश असल्याने ही नामुष्की नागपूरवर ओढवली आहे.
आॅक्टोबर २०१४ मध्ये डीजीसीएचे वरिष्ठ अधिकारी क्लबच्या तपासणीसाठी नागपुरात आले होते. त्यांनी काही त्रुटी काढून क्लबचा परवाना कायम ठेवून विमान उड्डाणाची परवानगी नाकारली. पण देखरेखीसाठी विमान उड्डाणाची क्लबची परवानगी कायम ठेवली. क्लबमध्ये स्थायी धर्तीवर प्रशिक्षक असावा, प्रशिक्षणार्थींना माहिती देण्यासाठी वेगवेगळे चेंबर असावेत, या त्रुटी अधिकाऱ्यांनी काढल्या होत्या. त्यानुसार क्लबने वेगवेगळ्या चेंबरची व्यवस्था केली, पण स्थायी प्रशिक्षकाची नेमणूक करणे क्लबला शक्य नाही. अधिकाऱ्यांनी काढलेल्या त्रुटी पूर्ण केल्याचे पत्र क्लबने डीजीसीएला जानेवारीमध्येच पाठविले आहे. पण त्यावर अधिकारी संतुष्ट नाहीत. जानेवारीपासून उड्डाणाला नव्याने परवानगी मिळावी म्हणून दिल्लीला सतत फोन करणे सुरू आहे.