केवळ उद्घाटनासाठी अडकले नागपूर फ्लाइंग क्लबच्या विमानांचे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 07:10 AM2021-12-19T07:10:00+5:302021-12-19T07:10:01+5:30

Nagpur News साडेचार वर्षांपासून बंद असलेल्या नागपुरातील फ्लाइंग क्लबमध्ये प्रशिक्षण उड्डाणांना एक महिन्यापूर्वीच परवानगी मिळाली आहे, पण केवळ उद्घाटनाचा मुहूर्त न निघाल्याने प्रशिक्षण उड्डाणे सुरू झालेली नाहीत.

The flight of Nagpur Flying Club got stuck just for the inauguration | केवळ उद्घाटनासाठी अडकले नागपूर फ्लाइंग क्लबच्या विमानांचे उड्डाण

केवळ उद्घाटनासाठी अडकले नागपूर फ्लाइंग क्लबच्या विमानांचे उड्डाण

Next
ठळक मुद्देएक महिन्यांपूर्वीच मिळाली परवानगीपदभरती अद्याप नाही

वसीम कुरैशी

नागपूर : साडेचार वर्षांपासून बंद असलेल्या नागपुरातील फ्लाइंग क्लबमध्ये संचालन सुरू होण्याएवढी व्यवस्था उपलब्ध झाली आहे. प्रशिक्षण उड्डाणांना एक महिन्यापूर्वीच परवानगी मिळाली आहे, पण केवळ उद्घाटनाचा मुहूर्त न निघाल्याने प्रशिक्षण उड्डाणे सुरू झालेली नाहीत.

हा क्लब ऐतिहासिक आणि विदर्भात असून, तो बंद राहण्याचा क्रम नवीन नाही. तो या आधीही बंद राहिला आहे. या क्लबला १६ नोव्हेंबर, २०२१ला एफटीओ अर्थात, फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनची परवानगी मिळाली आहे. उड्डाणांसाठी परवानगी मिळाल्याच्या एक महिन्यानंतरही प्रशिक्षण विमानांचे संचालन सुरू झालेले नाही किंवा बंद ठेवण्यात आल्याची शक्यता आहे. क्लब पूर्वी साडेचार वर्षांपेक्षा जास्त बंद असल्यामुळे काही जुने विद्यार्थी या क्षेत्रात करिअर घडवू शकले नाहीत. एवढ्या वर्षांनंतरही क्लबचे दोन विमान आताही तयार नाहीत.

पदभरती झालीच नाही

या फ्लाइंग क्लबला आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये पूर्णत्व प्राप्त करता आले नाही. सध्या पाच पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदभरतीत जुन्याच पद्धतीने काम सुरू राहिल्यास काही कार्यात पुन्हा त्रुटी राहण्याची शक्यता आहे. चार विमाने तयार असल्याचे आधी म्हटले जायचे, पण एक विमानाचे एआरसी प्रमाणपत्र मिळाले नाही. क्लबकरिता सीएफआयऐवजी उपसीएफआयच्या नेतृत्वात काम चालवावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्घाटनाची चर्चा होती, पण अद्याप उद्घाटन झालेच नाही.

Web Title: The flight of Nagpur Flying Club got stuck just for the inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान