पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:31 PM2020-09-21T12:31:12+5:302020-09-21T12:33:24+5:30

पूरस्थितीमुळे नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात २९२६२.११ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

Flood damage to 29,000 hectares in Nagpur district | पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देसोयाबीन कापसाला सर्वाधिक फटकाकृषी विभागाने शासनाकडे सादर केला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात २९२६२.११ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला आहे.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपस्थितीने जिल्ह्यातील मौदा, कामठी, पारशिवनी, कुही, नरखेड, रामटेक, सावनेर या तालुक्यातील ६१ वर गावे बाधित झाली असून ४९११ कुटुंबांना फटका बसला आहे. महसूल विभागातर्फे यापूर्वीच बाधित क्षेत्रातील शेतीसह, नागरी भागातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. पूरामुळे १६०२ जनावरे मृत्यू पावलेत, ७७६५ घरांची पडझड झाली. ५० जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. जिल्ह्यात यंदा खरीपाचे एकूण क्षेत्र ५ लाख १०० हेक्टर इतके नियोजित करण्यात आले होते. यापैकी २९ हजार २६२.११ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोरडवाहूतील २७८२९.८५ हेक्टर, ओलिताखालील १३५२.४७ हेक्टर व बहुवार्षिक पिकाखालील ७९.७९ हेक्टरचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर, धान या मुख्य पिकांसह भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

यंदा कोरोनानंतरही जिल्ह्यात खरीपामध्ये बंपर पेरणी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादनाची हमी होती. परंतु पुरामुळे शेतकºयांवर चांगलेच संकट कोसळले आहे. पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्राचेही पथक जिल्ह्यात येऊन गेले. जिल्हा प्रशासन व कृषी विभागानेही नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Web Title: Flood damage to 29,000 hectares in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर