नागपूर जिल्ह्यात कन्हान नदीला पूर; नदीकाठच्या गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 10:27 AM2020-08-29T10:27:16+5:302020-08-29T10:27:38+5:30

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अखंडधारेमुळे जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदीला पूर आला असून अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे.

Flooding of Kanhan river in Nagpur district; | नागपूर जिल्ह्यात कन्हान नदीला पूर; नदीकाठच्या गावांना धोका

नागपूर जिल्ह्यात कन्हान नदीला पूर; नदीकाठच्या गावांना धोका

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अखंडधारेमुळे जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कन्हान नदीला पूर आला असून अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे.
खापा गावाला नदीच्या पाण्याने घेरले असून गावातील काहीजणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. खापा, सावनेर, रामटेक, बडेगाव येथील रस्ते पाण्याने बंद झाले आहेत. कोच्छी, छोटी आजनी, या गावांमधील अनेक घरे पाण्यात बुडाली आहेत. वारेगाव येथील नरहरी कठीराम जाधव यांची बैलजोडी नदीच्या पुरात वाहून गेली.
या भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून, धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

पेंच ओव्हरफ्लो,१६ गेट उघडले
पारशिवनी तालुक्यातील पेंच धरणाचे १६ गेट उघडण्यात आले. पूर्ण गेट उघडण्यापूर्वी नदीशेजारील गावांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी ४ गेट खुले होते .दुपारी २ वाजता पूर्ण १६ दरवाजे ०.५ मीटरने उघडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता पूर्ण गेट २ मीटरने उघडण्यात आले. सायंकाळी ६.१५ वाजता ८ दरवाजे २ मीटरने तर इतर ८ दरवाजे २.५ मीटरने उघडण्यात आले. एकूण ३४४८.१६ क्युसेक प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू होता. यासोबतच पेंचचा डावा व उजवा कालवा उघडण्यात आला आहे. त्यामुळे कुणीही पेंच धरण बघायला येऊ नये तसेच नदीशेजारील गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता प्रणय नागदेवे यांनी केले आहे.

Web Title: Flooding of Kanhan river in Nagpur district;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर