मेयो रुग्णालयातील कोरोनाच्या योद्ध्यांवर पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:29 PM2020-05-04T21:29:28+5:302020-05-04T21:30:30+5:30

कोरोनाच्या लढ्यात सर्वात समोर असलेल्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना नागपूर पोलीस बिनतारी संदेश विभाग व एअरो थ्रॉटलच्या वतीने अनोखी मानवंदना देण्यात आली. मेयो रुग्णालयावर ड्रोनच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली.

Flower showers on Corona Warriors at Mayo Hospital | मेयो रुग्णालयातील कोरोनाच्या योद्ध्यांवर पुष्पवृष्टी

मेयो रुग्णालयातील कोरोनाच्या योद्ध्यांवर पुष्पवृष्टी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या लढ्यात सर्वात समोर असलेल्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना नागपूर पोलीस बिनतारी संदेश विभाग व एअरो थ्रॉटलच्या वतीने अनोखी मानवंदना देण्यात आली. मेयो रुग्णालयावर ड्रोनच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. मेयोच्या वॉर्ड - ४ च्या समोरील परिसरात सर्व वरिष्ठ व निवासी डॉक्टर एकत्र आल्यानंतर एअरो थ्रॉटलच्या वतीने आकाशात ड्रोनने भरारी घेतली आणि पाहता पाहता उपस्थितांवर पुष्पांचा वर्षाव केला. यावेळी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण, ईएनटी विभागप्रमुख जीवन वेदी, मेडिसीन विभागप्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे, डॉ. बन्सल, मेट्रन साधना गावंडे यांच्यासह पोलीस उपायुक्त विक्रम साळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल साखरे, विजय मोहिते, रवी निमकरडे, पंकज मोरे व एअरो थ्रॉटलचे संचालक उमेश राऊत आदी उपस्थित होते. या मानवंदनेने रुग्णालयातील योद्धेसुद्धा हरखून गेले.
 

Web Title: Flower showers on Corona Warriors at Mayo Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.