खापरखेड्याची फ्लाय ॲश कन्हानमध्ये, नागपूरचा २५ टक्के पाणीपुरवठा बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2022 11:06 AM2022-10-12T11:06:06+5:302022-10-12T11:08:04+5:30

उत्तर, पूर्व आणि दक्षिण नागपुरातील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित

Fly ash of Khaparkheda is flowing into Kanhan river, 25 percent water supply of Nagpur is affected | खापरखेड्याची फ्लाय ॲश कन्हानमध्ये, नागपूरचा २५ टक्के पाणीपुरवठा बाधित

खापरखेड्याची फ्लाय ॲश कन्हानमध्ये, नागपूरचा २५ टक्के पाणीपुरवठा बाधित

Next

नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील फ्लाय ॲश तलावातून फ्लाय ॲश वाहून कन्हान नदीत येत आहे. ही ॲश कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या इनटेक विहिरीजवळ ही ॲश जमा झालेली झाली आहे. यामुळे आसीनगर, नेहरूनगर, लकडगंज व सतरंजीपुरा झोनमधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित झाला आहे. सध्या कन्हान केंद्रातील जलशुद्धीकरण केंद्रातून ६५ टक्केच पंपिंग होत आहे.

वारेगाव ओव्हरफ्लो पॉईंटवरून फ्लाय ॲश स्लरीचा ओव्हरफ्लो विसर्जन कोलार नदीत वाहतो. नंतर शेवटी कन्हान नदीला मिळतो. कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात नदीच्या पाण्यात मिसळलेल्या फ्लाय ॲशवर प्रक्रिया होऊ शकत नाही. त्यामुळे नदीच्या उजव्या काठावर असलेल्या (ड्रायवेल) कच्च्या पाण्याचे पंप बंद करावे लागले आहे. ३५ टक्के पंपिंग पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.

दोन महिन्यांत तिसऱ्यांदा फ्लॉय ॲश

कन्हान नदीत दोन महिन्यांत तिसऱ्यांदा फ्लॉय ॲश वाहून आली आहे. पहिल्यांदा जवळपास एक आठवडा पाणीपुरवठा बाधित झाला होता. त्यावेळी कन्हान नदीला पूर आला होता.

फ्लाय ॲशमिश्रित पाण्यावर प्रक्रिया शक्य नाही

कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात पुराचे मातीमिश्रित पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध केली जाते; परंतु फ्लाय ॲशमध्ये वेगळे घटक असल्याने त्यावर प्रक्रिया शक्य नाही. त्यामुळे पंप बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी, जलशुद्धीकरण केंद्रातील काही पंप बंद ठेवण्यात आले आहेत.

ॲश सुरक्षित साठवत नसल्याने धोका

खापरखेडा औष्णिक केंद्राचा वारेगाव येथे फ्लाय ॲश साठविण्याचा तलाव आहे. पाणीमिश्रित फ्लाय ॲशमधून पाणी वेगळे करून त्याचा पुनर्वापर केला जातो; परंतु मागील काही महिन्यांत तीनदा फ्लाय ॲश कन्हान नदीपात्रात आल्याच्या घटना घडल्या. फ्लाय ॲश सुरक्षित साठविली जात नसल्याने ती नदीपात्रात येत असल्याचे धोकादायक प्रकार घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Fly ash of Khaparkheda is flowing into Kanhan river, 25 percent water supply of Nagpur is affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.