नागपुरातून ‘उडान’ फ्लाईटचे संचालन करू शकते ‘फ्लाईबिग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:39 AM2020-12-10T11:39:41+5:302020-12-10T11:40:32+5:30

Nagpur News रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस(आरसीएस)अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढच्या वर्षी फ्लाईबिग एअरलाईनची विमानसेवा सुरू होऊ शकते.

Flybig can operate 'Udan' flight from Nagpur | नागपुरातून ‘उडान’ फ्लाईटचे संचालन करू शकते ‘फ्लाईबिग’

नागपुरातून ‘उडान’ फ्लाईटचे संचालन करू शकते ‘फ्लाईबिग’

Next
ठळक मुद्देएअरलाईन्सची नागपूर विमानतळ व्यवस्थापनासोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रिजनल कनेक्टिव्हिटी सर्व्हिस(आरसीएस)अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढच्या वर्षी फ्लाईबिग एअरलाईनची विमानसेवा सुरू होऊ शकते. यासंदर्भात नागपूर विमानतळाचे संचालक करणारी कंपनी मिहान इंडिया लिमिटेडसोबत (एमआयएल) फ्लाईबिग एअरलाईन्सची चर्चा झाली आहे.

सध्या फ्लाईबिग एअरलाईन्स इंदूर, भोपाळ आणि रायपूर येथून विमानांचे संचालन करीत आहे. एअरलाईन्स आपल्या नेटवर्कमध्ये नागपूरला जोडण्यास रुची दाखवीत आहे. फ्लाईबिग नागपुरातून पुणे, हैदराबाद, भोपाळकरिता उत्तम सेवा पाहत आहे. ही विमानेसवा सुरू झाल्यास नागपूरकरांना मोठा फायदा होणार आहे. आरसीएस विमानसेवेंतर्गत भाडेही कमी असणार आहे.

फ्लाईबिगसोबत झाली चर्चा

फ्लाईबिग एअरलाईन्ससोबत नागपुरातून विमानसेवा सुरू करण्यावर चर्चा झाली आहे. तयारी असेल तर कंपनीला विमानतळावर आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.

आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

Web Title: Flybig can operate 'Udan' flight from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान