फ्लाईंग क्लबकडे अद्याप कसलीही मंजुरी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 11:37 PM2021-01-21T23:37:33+5:302021-01-21T23:39:00+5:30

Flying Club, nagpur news नागपूर फ्लाईंग क्लब ट्रेनिंग फ्लाइट तर दूरच, सध्या टेस्ट फ्लाईट करण्याच्याही स्थितीत नाही. अद्यापपर्यंत फ्लाईंग क्लबला कसल्याही प्रकारच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत, अशी माहिती आहे.

The Flying Club has not yet received any approval | फ्लाईंग क्लबकडे अद्याप कसलीही मंजुरी नाही

फ्लाईंग क्लबकडे अद्याप कसलीही मंजुरी नाही

Next
ठळक मुद्देएरोक्लब ऑफ इंडियाच्या दोन विमानांना परवाना मिळालाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर फ्लाईंग क्लब ट्रेनिंग फ्लाइट तर दूरच, सध्या टेस्ट फ्लाईट करण्याच्याही स्थितीत नाही. अद्यापपर्यंत फ्लाईंग क्लबला कसल्याही प्रकारच्या परवानग्या मिळालेल्या नाहीत, अशी माहिती आहे. पूर्वी जानेवारीच्या अखेरपर्यंत टेस्ट फ्लाईट होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र या वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या एप्रिलपर्यंत मिळण्याची शक्यता असल्याने आता टेस्ट फ्लाईट होणे अवघड दिसत आहे.

डायरेक्टर एयरवर्दीनेसकडून अद्याप एयरवर्दीनेस सर्टिफिकेट मिळालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एरोक्लब ऑफ इंडियाच्या दोन विमानांना फ्लाईंगसाठी परवाना मिळालेला नाही. चीफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरची नियुक्तीही झालेली नाही. यामुळे टेस्ट फ्लाईटसाठी बाहेरून त्यातल्या त्यात कमी शुल्क घेणाऱ्या पायलटचा शोध घेतला जात आहे. विमानांसाठी स्पेशल फ्लाईट परमिट आवश्यक असते. तेसुद्धा अद्याप मिळालेले नाही. टेस्ट फ्लाईट झाल्यानंतर त्याचा अहवाल डीजीसीए यांना पाठविला जाईल. त्यानंतर एआरसीसाठी पडताळणी केली जाईल. यात त्रृट्या निघाल्या तर त्या पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांदा डीजीसीएची चमू येऊन निरीक्षण करेल.

सर्व काही योग्य असल्याची पडताळणी झाल्यावरच एआरसी मिळणार आहे. यानंतर फ्लाईंग ट्रेनिंग ऑर्गनायजेशनसाठी वेगळे थेट फ्लाईट ट्रेनिंगचे निरीक्षण होईल. या सर्व प्रक्रियेनंतरच एफटीओचे प्रमाणपत्र मिळणार आहे. अलीकडेच दोन-चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली असून उर्वारित कर्मचाऱ्यांची नियुक्ती अद्याप झालेली नाही.

महत्त्वाचे म्हणजे, ऑगस्ट २०१७ पासून क्लबची उड्डाणे बंद आहेत. मात्र क्लब बंद झालेला नाही. आतापर्यंत ३ वर्षे ५ महिन्यांचा कार्यकाळ होऊनही क्लब सुरू असताना मंजुरी, प्रमाणीकरण तसेच लायसन्स मिळविण्यात रुची का दाखविण्यात आली नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळी नागपूरच्या फ्लाईंग क्लबचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद साळवे यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांनी व्यस्ततेचे कारण सांगून बोलणे टाळले.

Web Title: The Flying Club has not yet received any approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर