जमिनीतील बॉक्साईटपासून बनते हवेत उडणारे विमान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:17 AM2019-01-17T01:17:59+5:302019-01-17T01:19:06+5:30
जमिनीतील बॉक्साईट नावाच्या खडकाची माती बनवितात. त्यावर सोडियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया करून सॉलिड पार्ट आणि लिक्विड पार्ट तयार करतात. लिक्विड पार्टवर सोडियम अॅल्युमिनेट लिकरची प्रोसेस करून पांढऱ्या रंगाचे अॅल्युमिना मिळते. त्याला १ हजार डिग्री तापमानावर तापवून अॅल्युमिनियमचे भांडे, केबल अन् हवेत उडणारे विमान तयार करतात येते, ही माहिती ऐकून रमण विज्ञान केंद्रातील सायन्स एक्स्पोला भेट देणारे विद्यार्थी, नागरिक थक्क झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जमिनीतील बॉक्साईट नावाच्या खडकाची माती बनवितात. त्यावर सोडियम हायड्रॉक्साईडची प्रक्रिया करून सॉलिड पार्ट आणि लिक्विड पार्ट तयार करतात. लिक्विड पार्टवर सोडियम अॅल्युमिनेट लिकरची प्रोसेस करून पांढऱ्या रंगाचे अॅल्युमिना मिळते. त्याला १ हजार डिग्री तापमानावर तापवून अॅल्युमिनियमचे भांडे, केबल अन् हवेत उडणारे विमान तयार करतात येते, ही माहिती ऐकून रमण विज्ञान केंद्रातील सायन्स एक्स्पोला भेट देणारे विद्यार्थी, नागरिक थक्क झाले.
गांधीसागर येथील रमण विज्ञान केंद्रात विविध संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधन आणि विकासाची माहिती देण्यासाठी विज्ञान एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांमध्ये विज्ञानाप्रति आवड आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन यशस्वी ठरले. प्रदर्शनात भारतीय मानवविज्ञान सर्वेक्षण, परमाणु खनिज आणि संशोधन संचालनालय, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन संस्था, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, मॅगनिज ओर इंडिया लिमिटेड, जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च डिझाईन अँड डेव्हलपमेंट सेंटर आदी संस्थांनी आपल्या संशोधनाची माहिती दिली.
आदिमानव ते जंटलमनचा प्रवास
प्रदर्शनात अँथ्रापॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडियातर्फे मानवाच्या प्रगतीचा आढावा घेणारी माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली. यात दोन आणि पायावर चालणाऱ्या मानवाच्या मेंदूचा विकास झाल्यानंतर तो दोन पायावर चालू लागला. दगड एकमेकांवर आदळून आग तयार करणे, शेती करण्याचे तंत्र त्याला आत्मसात झाले अन् तो आधुनिक झाल्याचा इतिहास सादर करण्यात आला. याशिवाय भारताच्या विविध भागात शेती करण्याचे प्रकार, अन्न साठविण्याच्या पद्धती, संस्कृती, घरे आदींवर प्रकाश टाकण्यात आला.
युरेनियमपासून वीजनिर्मिती
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने युरेनियमपासून वीज कशी तयार होते, याची माहिती वरिष्ठ कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांनी दिली. यात युरेनियम आणि जड पाणी घेऊन ते प्रेशराईज हेवी वॉटर रिअॅक्टर या अणुभट्टीत नॅचरल युरेनियम इंधन म्हणून वापरतात तर जड पाणी कुलंट म्हणून वापरतात. अणुभट्टीत नॅचरल युरेनियमचे विखंडन होते आणि यादरम्यान उष्णता तयार होते. या उष्णतेचा वापर करून बॉयलरमध्ये साध्या पाण्याची वाफ बनवितात. या वाफेवर टर्बाईन जनरेटरच्या माध्यमातून वीज तयार करतात. देशात अशा २२ अणुभट्ट्या असून, दररोज ६,७८० मेगावॅट वीज तयार करण्यात येते.
भूगर्भातील खनिजांचा शोध
मिनरल एक्स्प्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेडचे आलोक डहरवाल यांनी जमिनीतील खनिजांचा शोध कसा घेतात याची माहिती दिली. ते म्हणाले, जमिनीतून कॉपर, लेड, झिंक, कोळसा, लाईम स्टोन, आयर्न यांचा शोध घेऊन ते किती प्रमाणात जमिनीत आहे याची माहिती मिळविण्यात येते. यात रिमोट सेंसींगने भूवैज्ञानिक निरीक्षण करण्यात येते. निरीक्षणानंतर रासायनिक विश्लेषण केल्यानंतर जमिनीत किती धातू आहे, त्याचा दर्जा कसा आहे याची माहिती मिळते. त्याचा अंतिम अहवाल तयार करून केंद्र शासनाला सादर केल्यानंतर संबंधित ठिकाणी खोदकामासाठी मंजुरी देण्यात येते.
विद्यार्थ्यांनी घेतली थंड हवा देणाऱ्या एसीची माहिती
इंडियन सोसायटी ऑफ हिटींग रेफ्रिजरेटींग अँड एअर कंडीशनरतर्फे एसीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पार्टची माहिती विद्यार्थ्यांना दिली. एसीतील कॉम्प्रेसर, खाली वर होणारा रेसी प्रोकेटींग, गोल फिरणारा स्क्रोल कॉम्प्रेसर आदींची माहिती विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.