Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:32 AM2019-10-01T00:32:15+5:302019-10-01T00:33:41+5:30

विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिल्यात.

Follow the directions of the Election Commission: Collector Ravindra Thakre | Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करा : जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

Next
ठळक मुद्देनिवडणूक यंत्रणा व पोलिसांमध्ये समन्वय ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिल्यात.
बचतभवन येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच विधानसभानिहाय निवडणूक अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.यावेळी अतिरिक्तजिल्हाधिकारी श्रीकांत फडके, पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलिस उपायुक्त निर्मला देवी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, पोलीस उपायुक्त निलोत्पल, राहुल माकणीकर, विक्रम साळी, विवेक मसाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे, श्रीकांत उंबरकर, डॉ. शिवनंदा लंगडापुरे, हेमा बडे, श्याम मदनूरकर, अतुल म्हेत्रे, हिरामण झिरवाळ, शेखर घाडगे, शीतल देशमुख, सुजाता गंधे उपस्थित होते.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदेर्शानुसार काम करताना कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच सतत वरिष्ठांच्या संपर्कात राहून, अडचण असेल तिथे मार्गदर्शन घ्यावे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान संवेदनशील आणि दक्ष राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे नामनिर्देशन पत्रे ही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तीन आणि तहसील कार्यालय परिसरात तीन अशी एकखिडकीच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहेत. तर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांची नामनिर्देशन पत्रेही त्या-त्या मतदारसंघातील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे स्विकारण्यात येणार आहेत. यावेळी ग्रामीण मतदारसंघातील नामनिर्देशन पत्रे स्विकारताना पोलीस उपविभागीय अधिकारी आणि उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी समन्वय ठेवून त्या ठिकाणी उमेदवारासोबत फक्त तीन वाहनांनाच परवानगी द्यावी. त्यामुळे परिसरात गर्दी होणार नाही आणि वाहतुकीस अडथळा येणार नाही, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.शहरातील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारासंघातील उमेदवार कदाचित एकाच दिवशी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची शक्यता लक्षात घेता, उप जिल्हा निवडणूक अधिकारी व पोलीस यंत्रणेने १०० मीटरपरिसरात वाहनांची गर्दी होणार नाही, याकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे दोन्ही यंत्रणांनी समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिल्या.
निवडणुकीसंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या
निवडणूक प्रक्रियेदरम्यान उप जिल्हा निवडणूक अधिकारी आणि संबंधीत मतदारसंघातील पोलीस अधिकारी यांनी वेळोवेळी भेट घेऊन समन्वय साधावा. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघातील जबाबदारी पार पाडत असताना कोणतीही अनुचित घटना घडल्यास वरिष्ठांना अवगत करावे. निवडणुकीसंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: Follow the directions of the Election Commission: Collector Ravindra Thakre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.