शासन नियम पाळा, अन्यथा नागपुरात कोविडचा उद्रेक : मनपा आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 10:18 PM2020-06-11T22:18:07+5:302020-06-11T22:19:21+5:30

‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्य शासनाच्या दिशार्निर्देशानुसार नागपूर शहरात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या शिथिलतेसह कोविड-१९ संसर्गाचा धोकाही अधिक वाढला आहे. शासन दिशानिर्देशांची कडक अंमलबजावणी नागरिकांनी केली नाही तर नागपुरात कोविड-१९ चा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त करतानाच नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Follow the rules of governance, otherwise the outbreak of Covid in Nagpur: Municipal Commissioner's warning | शासन नियम पाळा, अन्यथा नागपुरात कोविडचा उद्रेक : मनपा आयुक्तांचा इशारा

शासन नियम पाळा, अन्यथा नागपुरात कोविडचा उद्रेक : मनपा आयुक्तांचा इशारा

Next
ठळक मुद्देबेजबाबदार वर्तनामुळे रुग्णात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत राज्य शासनाच्या दिशार्निर्देशानुसार नागपूर शहरात अनेक बाबींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या शिथिलतेसह कोविड-१९ संसर्गाचा धोकाही अधिक वाढला आहे. शासन दिशानिर्देशांची कडक अंमलबजावणी नागरिकांनी केली नाही तर नागपुरात कोविड-१९ चा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त करतानाच नागरिकांनी नियम पाळावेत, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागरिकांतर्फे कोविड-१९ च्या गाईडलाईनचे पालन न करणे, खबरदारी न घेणे, बेजबाबदार वर्तन यामुळे कोविड-१९ च्या रुग्णात मोठी वाढ होत आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ स्वत:चा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालणे नव्हे. चारचाकी वाहनात वन प्लस टू आणि दुचाकीवर केवळ एक व्यक्ती अनुज्ञेय असताना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स्ािंगचे पालन न करणे, आवश्यकता नसतानाही घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा वागण्यामुळे शहरात कोविड-१९ संसर्गाचा गुणाकार होण्यास सुरुवात झाली आहे. ही धोक्याची घंटा आहे. हे शहर आपले आहे. या शहराला सुरक्षित ठेवायचे असेल तर नागरिकांनी नियम पाळायलाच हवे.

फौजदारी कारवाईस बाध्य करू नका
नियमांचे उल्लंघन करून फौजदारी कारवाई करण्यास नागरिकांनी बाध्य करू नये. हे शहर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी नागरिकांचीच आहे. खबरदारी घ्या, प्रशासनाला साथ द्या, जबाबदारी दोघेही घेऊ आणि कोरोनाची साखळी खंडित करू, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे. असे केले नाही तर नागपुरात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण वाढतील. मृत्यूसंख्याही वाढेल. आपण सर्वांनी एकत्रित नियमांचे पालन केले तर हे टाळता येईल. नागपूर कोरोनामुक्त करता येईल, असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

Web Title: Follow the rules of governance, otherwise the outbreak of Covid in Nagpur: Municipal Commissioner's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.